जिल्हा पोलिसप्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक सुनील पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसेतज्ज्ञ आदी पथक शुक्रवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले. या हत्येचा शोध घेत असतानाच शुक्रवारी सायंकाळी मंदिरापासून काही अंतरावर अविनाश कदम यांच्या विहिरीतून दुर्गंधी येऊ लागल्याने पाहणी केली असता दहातोंडे यांचे उर्वरित शरीर आढळून आले. या घटनेमुळे बोधेगाव भागात एकच खळबळ उडाली आहे.
दहातोंडे मूळ नागलवाडी (ता शेवगाव) येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
या घटनेचा सखोल तपास करून हल्लेखोरांना तातडीने अटक करावी व या गंभीर घटनेचा तपास एलसीबीकडे देण्यात यावा या मागणीसाठी विविध संघटनांनी बोधेगावात शनिवारी कडकडीत बंदचे आवाहन केले आहे. या प्रकरणी संशयित म्हणून एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही क्रूर हत्येबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.