तोडलेल्या वृक्षांच्या खोडाचे पुनर्रोपण करून वाचवले:पालवीही फुटली

2 days ago 2
अमरावती तोडलेले वड, पिंपरी या दोन झाडांचे खोड रस्त्याच्या कडेला तसेच पडून असल्याचे बघून काही वृक्षप्रेमींना वाईट वाटले. त्यांनी बारकाईने बघितल्यानंतर या तोडून रस्त्याच्या कडेला पडलेल्या खोडांना पालवी फुटल्याचे त्यांना दिसले. त्यांनी मनपा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर मनपा प्रशासनाने वेगाने हालचाली करून पोकलेनच्या मदतीने झाडाची खोडे उचलून ती छत्री तलावावर नेली व तेथे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्रोपण करण्यात आले. मनपाद्वारे प्रथमच असा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. प्रशांतनगर येथील हनुमान मंदिराजवळ परवानगीने अत्यावश्यक कामात अडथळा ठरणारे वडाचे झाड कापण्यात आले. खोड काही दिवस तसेच पडून होते निसर्गप्रेमी प्रदीप पाटील, आशिष कडू यांनी या खोडांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यानंतर वॉर संस्थेचे पर्यावरणप्रेमी नीलेश कंचनपुरे यांनाही दस्तुरनगर येथे पिंपरीचे खोड दिसले. त्यांनी या दोघांशी संपर्क साधून एकत्रितपणे मनपा आयुक्तांना त्यांचे पुनर्रोपण करण्याची मागणी केली. मनपाद्वारे असा उपक्रम याआधी कधीही राबवण्यात आला नव्हता. त्यामुळे मनपा आयुक्त सचिन कलंत्रे, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, व उद्यान अधीक्षक श्रीकांत गिरी यांनी चर्चा करून खोडाचे पुनर्रोपण करण्यावर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर पोकलेनच्या मदतीने तेथून छत्री तलावावर नेण्यात आले. तेथे मनपा उद्यान विभाग व वृक्षप्रेमींच्या मदतीने या खोडांचे पुनर्रोपण करण्यात आले. आता या खोडांना पालवी फुटली आहे, असे वृक्षप्रेमी नीलेश कंचनपुरे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article