त्रिविक्रम भगवान की जयच्या जयघोषाने दुमदुमली शेंदुर्णी नगरी, प्रति पंढरपूर शेंदुर्णीनगरीत २८० वर्षांचीपरंपरा असलेला रथोत्सवजल्लोषात साजरा
2 hours ago
1
सुमारे २८० वर्षाची परंपरा असलेला प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरीतील रथोत्सव शुक्रवारी मोठ्या थाटामाटात पारंपारिक पद्धतीने हजारो भक्तांच्या उपस्थितीत साजरा झाला. संतश्रेष्ठ कडोजी महाराज यांनी सन १७४४ मध्ये पहिला रथोत्सव शेंदुर्णी नगरीत सुरू केला. आजही त्याच भक्तिभावाने मोठ्या हर्षोउल्हासात रथोत्सव साजरा झाला.संत कडोजी महाराज मंदिरात त्रिविक्रम भगवान व संत कडोजी महाराजांच्या मूर्तीची पूजा अर्चा करण्यात आली. कडोजी महाराज संस्थानचे आठवे गादी वारस हभप शांताराम महाराज भगत, तुषार भगत, योगिता भगत, मंत्री गिरीश महाजन, दिलीप खोडपे, गोदावरी फाउंडेशन जळगावच्या केतकी पाटील, शिवराज गरुड व अन्य मान्यवरांनी रथाची पूजा व आरती केली. त्यानंतर रथ प्रदक्षिणेला निघाला. महिला भजनी मंडळ, पुरुष भजनी मंडळ,विविध देवदेवतांचे सजीव देखावे, बजरंग बली महाकाय मूर्ती,अश्व, पालखी भाविकांचे डोळ्याचे पारणे फेडत होते. रथासमोर कानगीसाठी तुषार भगत, राजेंद्र पवार, चोपदार विजय सोनार, गजानन सुतार, मोगरी लावणारे देवराम चौधरी, प्रल्हाद भगत, शिवाजी भगत यांच्यासह इतर रथोत्सवासाठी परिश्रम घेणारे भाविक भक्त उपस्थित होते. विदर्भ, मराठवाडा, खान्देशातून हजारो भाविकांची उपस्थिती होती. कडोजी महाराज पुण्यतिथी निमित्ताने मंदिरात कीर्तन, रविवारी त्रिविक्रम मंदिरात दहीकाला व बुधवारी रात्री भक्त पुंडलिकाची मिरवणूक, संत श्रेष्ठ कडूजी महाराज विठ्ठल रुक्मिणी रथोत्सवाची सांगता रथ घरामध्ये होणार आहे. नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी विवेक धांडे यांनी,पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस निरीक्षक सचिन सानप, नंदकुमार शिंब्रे व कडोजी संस्थांच्या वतीने तुषार महाराज भगत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नियोजन करण्यात आले. भाविकांच्या वतीने केळीचा प्रसाद रथाला अर्पण करण्यात आला. हा प्रसाद खाल्ल्याने विघ्न टळते अशी आख्यायिका आहे.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)