दवाखान्यासाठी 1 कोटीची मागणी करून छळ:परभणीत डॉक्टर पत्नीची आत्महत्या, राहत्या घरी घेतला गळफास, डॉक्टर पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

2 days ago 3
दवाखाना बांधण्यासाठी माहेरहून १ कोटी रुपये आणावे, या मागणीसाठी सासरी होणाऱ्या त्रासाला कंटाळून, एमबीबीएस डॉक्टर असलेल्या ३० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १४ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पालम शहरातील लोहा रोडवर घडली. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरा डॉक्टर पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. डॉ. प्रियंका नीलेश व्हरकटे असे मृत विवाहितेचे नाव आहे. त्यांचे लग्न २०२२ मध्ये बीड येथील नीलेश व्हरकटे याच्यासोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी रुग्णालय टाकण्यासाठी, माहेरहून १ कोटी रुपये आणावे, अशी मागणी करत विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. याबाबत भरोसा सेलकडे तक्रार देण्यात आली होती. तडजोड न झाल्याने पालम पोलिसांत सासरच्या मंडळीवर गुन्हा नोंदवण्यात आला. त्यानंतर सासरकडील मंडळी मोबाइलवरून संपर्क करून विवाहितेला त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून सोमवारी १४ रोजी डॉ. प्रियंका यांनी पालम येथे राहत्या घरी गळफास घेतला. यात प्रियंकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुनंदा भुमरे यांनी तक्रार दिली आहे. मृत्यूस कारणीभूत ठरल्याने पती डॉ.नीलेश व्हरकटे, राम व्हरकटे, सुनीता व्हरकटे, तेजस व्हरकटे, तनया व्हरकटे यांच्यावर पालम पोलिसात गुन्हा दाखल झाला. १५ दिवसांत दुसरी घटना पैठण येथील डॉ.पूजा व्होरकटे यांनीही १ ऑक्टोबरला, आपल्या ५ महिन्यांच्या बा‌ळासह गोदावरी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. बाळाला अंगावर पाजता येत नसल्याच्या नैराश्यातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले होते. या घटनेनंतर १५ दिवसांच्या अंतराने पुन्हा महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तीन महिन्यांपूर्वी राजीनामा मृत डॉ.प्रियंका व्हरकटे तीन महिन्यांपूर्वी कोदरी (ता.गंगाखेड) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. मात्र, तीन महिन्यांपूर्वी त्यांनी नोकरी सोडली होती. त्यांचे पती डॉ. नीलेश व्हरकटे हे एमडी आहेत, अशी माहिती परभणीचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राहुले गित्ते यांनी दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article