दांडीया खेळताना एका तरुणावर धारदार कोयत्याने वार:आरोपी जेरबंद, पुणे पोलिसांची कारवाई

3 days ago 3
दांडीया खेळताना कार्यक्रमात एका तरुणावर धारदार कोयत्याने वार करुन पसार झालेल्या सराईत गुन्हेगार आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अमित दीपक चोरगे (वय २७), अक्षय किसन सावंत (वय २८), अजय किसन रांजणे (वय २६), प्रसाद दत्तात्रय रांजणे (वय २२), सिद्धेश शिवाजी सणस (वय २६), विजय रघुनाथ रांजणे (वय १९, सर्व रा. आंबेगाव खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात अर्जुन दिलीप मोरे (वय १९, रा. विश्वात्मक जंगली महाराज ट्र्स्ट, मोहिली, शहापूर, जि. ठाणे ) गंभीर जखमी झाला होता. मोरे याने याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. मोरे आणि त्याच्या मामाचा मुलगा कात्रज भागातील संतोषनगर परिसरात आठ ऑक्टोबर रोजी रात्री दांडीयाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी सराईत गुन्हेगार अमित चोरगे आणि साथीदार त्याठिकाणी आले. संतोषनगर परिसरात चोरगेची काहीजणांशी भांडणे झाली होती. वादातून चोरगे आणि साथीदारांनी दांडिया कार्यक्रमात कोयते उगारून दहशत पसरवली. टोळक्याने कोयते उगारल्याने दांडीया कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले नागरिक भितीने पळाले. मोरे आणि त्याच्या मामाचा मुलगाही तेथून पळाले. पळताना मोरे पडला. त्यावेळी चोरगे आणि साथीदारांनी रस्त्यात पडलेल्या मोरेवर कोयत्याने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. चोरगे आणि त्याच्याबरोबर असलेले साथीदार दहशत माजवून पसार झाले. पसार झालेल्या चोरगे आणि साथीदार कात्रज घाटात थांबल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी सागर बोरगे, मितेश चोरमले यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून त्यांना पकडण्यात आले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नंदिनी वग्याणी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक शरद झिणे, सहायक निरीक्षक समीर कदम, समीर शेंडे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, मितेश चोरमले, अवधूत जमदाडे, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, नामदेव रेणुसे, चेतन गोरे यांनी ही कारवाई केली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article