दिव्य मराठी अपडेट्स:अंबे दार उघड अन् आमच्या विरोधात बोलणाऱ्यांचा सत्यानाश कर- गुलाबराव पाटील

2 hours ago 1
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स गुलाबराव पाटील यांचा विरोधकांवर हल्लाबोल अंबे दार उघड आणि आमच्या विरोधात जे बोलत आहेत व गोरगरिबांना जे हिनवत आहेत त्यांचा सत्यानाश कर, असे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गुलाबराव पाटील यांची जळगावात सभा पार पडली. या सभेत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ​​​​​​​​​ पुण्यात शर्ट इन न केल्याच्या रागातून शिक्षकाची मुलास मारहाण कॉम्प्युटरच्या क्लाससाठी गेलेल्या एका मुलाने शर्ट इन केले नसल्याचे शिक्षकाला दिसले. त्यामुळे त्यांनी 11 वर्षीय मुलास बेदम मारहाण केल्याने मुलाच्या कानातून व नाकातून रक्तस्त्राव हाेऊन मुलगा जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलाच्या पालकांनी संगणक शिक्षकाविराेधात स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगा हा 11 वर्षाचा असून ताे सहावी इयत्तेत शिक्षण घेत आहे. क्लास रुममध्ये कॉम्प्युटरचा क्लास सुरू असताना शिक्षक संदेश भाेसले (27) यांनी मुलास हाताने बेदम मारहाण केली. त्यामुळे मुलाच्या नाकातून व कानातून रक्त येऊ लागले. मुलगा शाळा सुटल्यानंतर घरी गेल्यावर मुलाने त्याच्या आईला घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी आराेपी शिक्षकाविराेधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस तानवडे करत आहे. ड्रग्ज तस्कर ललित पाटील प्रकरणातील बडतर्फ केलेले 5 पोलिस पुन्हा सेवेमध्ये घ्या- मॅट पुणे अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या महिला पोलिस उपनिरीक्षकासह पाच जणांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहेत. संबंधित कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई येथे धाव घेतली होती. न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयानुसार संबंधितांना पुन्हा सेवेत घेण्यात आले आहे. ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करी करणारा ललित पाटील पोलिसांचा बंदोबस्त असताना पळून गेला. पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्याने पाटीलला पळून जाण्यास मदत झाल्याच्या आरोपावरून पोलिस​​​​​​​ उपनिरीक्षक मोहिनी अविनाश डोंगरे, पोलिस हवालदार रमेश जनार्दन काळे, नाथाराम भारत काळे, दिगंबर विजय चंदनशिव आणि अमित सुरेश जाधव यांना पोलिस​​​​​​​ दलातून बडतर्फ करण्यात आलं होतं. त्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी मॅट येथे धाव घेतली. सुनावणी अखेर त्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार त्यांना पुन्हा एकदा पुणे पोलिस दलात समावेश करण्यात आला आहे, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी नियंत्रण कक्ष आणि पोलिस मुख्यालय या ठिकाणी त्यांची नव्याने नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. अहिल्यानगरात नरसिंहानंद सरस्वती महाराजांविरुद्ध गुन्हा प्रवचनातून दुसऱ्या धर्मगुरूंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करीत धार्मिक भावना दुखावल्यामुळे यती नरसिंहानंद सरस्वती महाराज यांच्याविरुद्ध अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी साहेबान अन्सार जहागीरदार, (रा. बेलदार गल्ली) यांनी फिर्याद दिली. यती नरसिंहानंद सरस्वती महाराज यांनी उत्तर प्रदेशातील त्यांच्या आश्रमात प्रवचन देताना हे वक्तव्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार, सोशल मीडियावरील ‘एक्स’ व यूट्यूब चॅनलवर प्रवचन देताना यती नरसिंहानंद यांनी धर्मगुरूंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले. पवारांकडून मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुकानिहाय इच्छुक उमेदवारांशी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात शनिवारी चर्चा केली. या वेळी माजी मंत्री राजेश टाेपे, बाबाजानी दुर्राणी, वंदना चव्हाण, फाैजिया खान, जयप्रकाश दांडेगावकर हे नेते उपस्थित हाते. शरद पवार यांनी मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव, हिंगाेली या जिल्ह्यांतील वेगवेगळ्या तालुक्यांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांना पुण्यात मुलाखतीसाठी बाेलावले हाेते. प्रत्येक तालुक्यात पक्षाची नेमकी किती ताकद आहे, उमेदवारी देण्यामागे पदाधिकाऱ्यांची काय भूमिका आहे याबाबतची माहिती शरद पवार यांनी घेतली आहे. सकाळी अकरा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मुलाखतींचे हे सत्र सुरू हाेते. योजनांच्या जाहिरातींसाठी सरकारचा कंपन्यांवर दबाव, काँग्रेसचे मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र बीएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 100 होर्डिंग मालकांना होर्डिंग्जवर 15 दिवस किंवा निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेची अंमलबजावणी होईपर्यंत राज्य सरकारच्या योजनांचा मोफत प्रचार करावा असे सांगितले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या दबावामुळे आऊटडोअर जाहिरात होर्डिंग्जचा राजकीय प्रचारासाठी जबरदस्तीने वापर केला जात आहे. यामुळे जाहिरात उद्योग मोठ्या संकटात सापडल्याचा आरोप काँग्रेसचे महासचिव आणि मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना पत्र लिहून केला आहे. सणासुदीच्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या नवीन नियमांमुळे व्यवसायांवर गंभीर परिणाम होत आहे. सरकारने आधीच 1000 कोटींपेक्षा जास्त रक्कम विविध प्रचार मोहिमांवर खर्च केली आहे. माध्यम मालकांना कोणत्याही मोबदल्याशिवाय किंवा आर्थिक मदतीशिवाय सरकारी योजनांचा मोफत प्रचार करण्यास भाग पाडणे अन्यायकारक असल्याचे पत्रात म्हटले आहे. इंडिगोची पुण्याहून भोपाळला विमानसेवा इंडिगो एअरलाइन्सने 27 ऑक्टोबरपासून पुण्याहून भोपाळला विमानसेवा सुरु करत असल्याचे जाहीर केले आहे. या नवीन मार्गामुळे पर्यटनासोबतच या दोन शहरांमधील व्यापारालाही प्रोत्साहन मिळेल. अनेक दिवसांपासूनच भोपाळ विमान सेवेची मागणी होत होती, ती या निमित्ताने पूर्ण होत आहे. या व्यतिरिक्त पुणे- इंदूर, पुणे- चेन्नई आणि पुणे- रायपूर या मार्गांवरही इंडिगो 27 ऑक्टोबरपासून उड्डाणांची संख्या वाढवणार आहे. पुण्याहून दररोज रात्री 1 वाजता इंडिगोचे विमान उड्डाण करेल व रात्री 2.35 वाजता भोपाळला पोहोचेल. तेथून पहाटे 3.05 वाजता निघून पहाटे 4.50 वाजता पुण्याला पाेहोचणार आहे. अंबाजोगाईत मजुरांचे दारू पिऊन‎भांडण; एकाचा खून‎ महावितरणच्या गुत्तेदाराकडे‎ कामाला असलेल्या मध्य प्रदेशातील ‎दोन कामगारांनी दारू पिऊन भांडण‎ केले. त्यात एकाने दुसऱ्याच्या ‎छातीत भोसकून खून केल्याची ‎घटना घडली. या प्रकरणी‎ आरोपीला पोलिसांनी अटक केली‎ आहे. बर्दापूर पोलिसांत गुन्हा नोंद‎करण्यात आला आहे.‎ अतुल रमेश घुले यांनी याबाबत‎ तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार,‎त्यांचा भाऊ हा महावितरणच्या ‎गुत्तेदारीचे काम करतो. त्यांच्याकडे‎ कामाला मध्य प्रदेशातील मजूर‎ आहेत. बर्दापूर शिवारात त्यांना‎ खोली करुन दिलेली होती. 1‎ ऑक्टोबर रोजी यातील एक मजूर‎ उमेश हरनाथ गोस्वामी (रा. रेवती‎इंदूर, मध्य प्रदेश) हा दारू पिऊन ‎एका झाडीत पडला होता. ही बाब‎ रामकिसन भय्यालाल पाल (रा.‎मडोर ता. ओरछा, जि. निवाडी,‎मध्य प्रदेश) याने व अन्य एका‎ कामगाराने अतुल घुले यांना‎ सांगितले. घुले व इतरांनी जाऊन‎ उमेशला शुद्धीवर आणून‎ मुक्कामाच्या ठिकाणाच्या खोलीत‎ आणले होते. रामकिसन पाल हाही ‎दारू प्यायलेला हाेता. उमेश याने मी ‎दारू प्यायल्याचे तू मालकाला का‎ सांगितले या कारणावरून‎ रामकिसन पाल याच्याशी वाद ‎घातला. त्याला शिवीगाळ केली.‎दोघांच्या भांडणात उमेश याने भाजी ‎कापण्याच्या चाकूने रामकिसनच्या ‎छातीत वार केले. यात तो गंभीर‎जखमी झाला. त्याला उपचारासाठी ‎दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाला‎ होता. या प्रकरणी उमेश‎गोस्वामीविरोधात खुनाचा गुन्हा‎ नोंदवला गेला. त्याला पोलिसांनी‎ अटक केली आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article