दिव्य मराठी अपडेट्स:इम्तियाज जलील यांची आज छत्रपती संभाजीनगर ते मुंबईत रॅली; रामगिरी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी

2 hours ago 2
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा.... अपडेट्स मराठा आरक्षणासाठी आज नगर जिल्हा बंद नगर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ नगर शहरातही मराठा समाजाचे प्रतिनिधी शुक्रवारपासून (20 सप्टेंबर) आमरण उपोषणास बसले आहेत. आता नगर जिल्हा मराठा समाजाच्या वतीने आज जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. अखंड मराठा समाजाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला याबाबत रविवारी निवेदन देण्यात आले आहे. सकल हिंदू समाजाची आज जालना शहर बंदची हाक जालना - हिंदू व्यापाऱ्यांच्या दुकानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या व वाढत्या गोहत्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारी जालना शहर बंदची हाक देण्यात आली आहे. मंगळवारी केवळ विराट मूकमोर्चा काढण्यात येणार आहे. दरम्यान, जालना शहरातील भाजीपाला मार्केट, काही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, सेंट मेरीज हायस्कूलमधील सहामाही परीक्षेचा 23 सप्टेंबर रोजी होणारा पेपर 26 सप्टेंबर रोजी ठेवण्यात आला आहे. ग्रामस्वच्छता स्पर्धेतील ग्रामपंचायतींचा आज गौरव‎ हिंगोली‎ - संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत‎राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत,‎राज्यस्तरावर निवड झालेल्या ग्रामपंचायतींच्या‎पुरस्कार वितरणासाठी शासनाला अखेर मुहूर्त‎गवसला आहे. आज 23 रोजी छत्रपती‎संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमात या‎पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.‎ संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात‎सकाळी 11 वाजता पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव‎पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या‎हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वेळी‎स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.‎ जायकवाडीतून कोणत्याही‎क्षणी पुन्हा सोडणार पाणी‎ पैठण‎ - जायकवाडी क्षेत्रात व वरील भागात‎रविवारी परतीचा पाऊस जोरदार‎झाला अाहे. त्यामुळे रविवारी‎ धरण साठा 99.45 % टक्के झाला‎होता. पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या‎पाण्याची आवक व ऊर्ध्व भागातील‎धरणांमधून येणारी आवक बघून‎पुढील दोन दिवसांत कोणत्याही‎क्षणी जायकवाडी धरणाच्या‎सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात‎विसर्ग केला जावू शकतो, अशी‎माहिती कार्यकारी अभियंता प्रशांत‎जाधव, विजय काकडे यांनी दिली ‎.‎कुणीही गोदावरी नदीपात्रात प्रवेश‎करू नये व कुठलीही जिवित व‎वित्त हानी होऊ नये, या करिता‎नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी‎खबरदारी घ्यावी, असे आवाहन‎पाटबंधारे विभागाच्या वतीने‎करण्यात आले आहे. यापूर्वी‎जायकवाडीतून दि. 9 सप्टेंबर ते 13‎सप्टेंबर दरम्यान मुख्य 27 पैकी 18‎गेट्समधून पाण्याचा 2.36 टीएमसी‎विसर्ग करण्यात आला होता.‎त्यामुळे पातळी वाढली होती.‎ मुंबईत एमआयएमची आज रॅली, सोलापुरातून कार्यकर्ते रवाना सोलापूर - मुंबईत सोमवारी एमआयएम पक्षाची रॅली आहे. त्यासाठी सोलापुरातून रविवारी शेकडो कार्यकर्ते रवाना झाल्याची माहिती जिल्हाध्यक्ष फारुख शाब्दी यांनी दिली. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे रामगिरी महाराज आणि आमदार नितेश राणे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी रॅली काढण्यात येत आहे. सर्व कार्यकर्ते पक्षाच्या कार्यालयासमोर जमले आणि रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास लक्झरी बस गाड्यांतून औरंगाबादसाठी रवाना झाले. महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते संभाजीनगरला पोहोचतील आणि तेथून मुंबईला रवाना होतील. रेल्वे रुळावरील डिटोनेटरची चौकशी सुरू भुसावळ - मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सागफाटा-डोंगरगावदरम्यान बुधवारी (दि. 18) दुपारी 2.30 वाजता रेल्वे रुळांवर डिटोनेटर आढळल्याने खळबळ उडाली होते. हा काही घातपाताचा प्रकार होता का? त्यादृष्टीने मध्य प्रदेश सुरक्षा यंत्रणा तपास करत आहे. या मार्गावर गस्त करणारे रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांना सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी हे दोघे कामावर होते. 18 सप्टेंबरला दुपारी 2.30 वाजता सेना एक्स्प्रेस जात हाेती. यावेळी रेल्वे रुळांवर धोक्याची सूचना देणारे डेटोनेटर फुटले. यामुळे रेल्वे गाडी थांबवण्यात आली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article