दिव्य मराठी अपडेट्स:खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये आजपासून 3 दिवस

2 hours ago 1
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आजपासून सिल्लोडमध्ये 3 दिवस रंगणार छत्रपती संभाजीनगर - राज्य सरकारच्या वतीने स्व. पहिलवान खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे 7 ते ९ ऑक्टोबरदरम्यान सिल्लोड येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यभरातून 300 पुरुष-महिला खेळाडू सहभागी होतील. त्याचबरोबर 100 पंच, प्रशिक्षक संघ व्यवस्थापक, अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुरुष खेळाडू फ्री स्टाइल व ग्रीको रोमन आणि महिलांमध्ये फ्री स्टाइल प्रकारात विविध 30 वजनी गटात आपले कौशल्य पणाला लावतील. खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था शासनाच्या वतीने करण्यात आली आहे. स्पर्धेच्या नियोजनासाठी विविध समित्या तयार केल्या आहेत. एसबीआय मार्चपर्यंत 10 हजार कर्मचारी भरणार मुंबई - भारतीय स्टेट बँकेत चालू आर्थिक वर्ष (2024-25) मध्ये दहा हजार नवीन कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. एसबीआयचे अध्यक्ष सीएस शेट्टी म्हणाले, आम्ही आमच्या कार्यबळास तंत्रज्ञानासह सामान्य बँकिंग पातळीवर देखील बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत. यंदा मार्चपर्यंत बँकेत 2 लाख 32 हजार 2९6 कर्मचारी होते. संभाजीनगरात ‘बुद्धलेणी बचाव’साठीआज निघणार मोर्चा, शाळांना सुटी जाहीर छत्रपती संभाजीनगर - बुद्धलेणीच्या पायथ्याशी असलेल्या विहार आणि विपश्यना केंद्राला 55 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. या वास्तूचे बांधकाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जागेवर नाही. तरीसुद्धा ही वास्तू अतिक्रमित असल्याचे सांगत नोटीस दिली. हा प्रकार सावरण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 12 धार्मिक स्थळे नियमित करण्यासाठी निर्देश दिले. परंतु नोटिसीमुळे भावना दुखावल्याने भिक्खू संघ, उपासक व आंबेडकरी समुदायातर्फे सोमवारी सकाळी 11 वाजता क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयापर्यंत ‘एल्गार मोर्चा’ काढण्यात येईल, अशी माहिती समन्वयक गौतम खरात यांनी दिली. दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील शाळांना सोमवारी सुटी जाहीर केली आहे. नांदेडला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत‎ आज होणारा मेळाव्याचा कार्यक्रम रद्द‎ नांदेड - आज सोमवारी 7 रोजी मुख्यमंत्री एकनाथ‎शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणारा,‎लाडक्या बहिणींचा मेळावा रद्द झाला अाहे, अशी‎ माहिती जिल्हा प्रशासनाने कळवली आहे. कृषी,‎ महिला, युवक, कामगार, महिला बचत गट, शिक्षण,‎ महिला सक्षमीकरण, आरोग्य या विषयांवर शासनाने ‎घेतलेल्या निर्णयांची माहिती देण्यासाठी, प्रत्येक‎ जिल्ह्यात मेळावे घेतले जात आहे. असा मेळावा 7 रोजी ‎नांदेडला आयोजित करण्यात आला होता. ‎प्रहारचे आमदार पटेल जाणार शिंदेंच्या सेनेेत अमरावती - मेळ‌घाटचे प्रहार पक्षाचे आमदार राजकुमार पटेल यांनी आपण शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा रविवारी दुपारी केली. तत्पूर्वी धारणी येथील बालाजी मंगलममध्ये त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. माझ्यासोबत आपणही शिवसेनेत सहभागी व्हा, असे आवाहन करत 10 ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करू, असे त्यांनी सांगितले. खा. श्रीकांत शिंदेंचे खंदे समर्थक दीपेश म्हात्रे उद्धवसेनेत दाखल मुंबई - शिवसेना शिंदेंच्या युवा सेनेचे सचिव आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खंदे समर्थक, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी रविवारी धनुष्यबाणाची साथ सोडून ठाकरेंची मशाल हाती घेतली आहे. रविवारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवबंधन बांधले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार श्रीकांत शिंदेंच्या लोकसभा क्षेत्रात शिंदेंच्या शिवसेनेला खिंडार पडले आहे. ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र, बालेकिल्ल्यातच पहिले खिंडार पाडण्यात उद्धव ठाकरे यशस्वी ठरले. संभाजीनगर-वैजापूर मार्गावर 8 ई-बस,‎तिकीट दर एसटीपेक्षा 20 रुपये जास्त‎ वैजापूर - राज्य परिवहन महामंडळाने छत्रपती‎संभाजीनगरहून वैजापूरसाठी स्वतंत्र पर्यावरणपूरक 8‎ई-बसेस सुरू केल्या आहेत. यापूर्वी छत्रपती‎संभाजीनगर ते मुंबई, छत्रपती संभाजीनगर ते नाशिक,‎छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी या मार्गावरून‎जाणाऱ्या बसमधून येथील नागरिकांना प्रवास करावा‎लागत होता. संभाजीनगर-ई-बसचे भाडे 180‎रुपये अाहे. ते एसटीपेक्षा 20 रुपयांनी अधिक आहे.‎ई-बसमध्ये एसटीच्या सवलती लागू आहेत.‎ बोपदेव घाट बलात्कार, दोनशे जणांची चौकशी पुणे - बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात 3 हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत असून दोनशेहून अधिक सराईतांची चौकशी करण्यात येणार आहे. बोपदेव घाट परिसरात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके आहेत. गेल्या पंधरा दिवसांत बोपदेव घाटमार्गे गेलेल्या तीन हजार मोबाइल वापरकर्त्यांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात येत आहे. त्याआधारे पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषण सुरू करण्यात आले आहे. बोपदेव घाटापासून 70 ते 80 किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही चित्रीकरण संकलित करण्यात येणार आहे. दरम्यान, आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांचे बक्षीस पोलिसांनी जाहीर केले आहे. बोपदेव घाटातील टेबल पाॅइंट परिसरात गुरुवारी रात्री तरुणी आणि तिचा मित्र फिरायला गेले होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. त्यांनी तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवला. मित्राला मारहाण करून त्याचा शर्ट काढला. शर्टने हातपाय बांधले. पँटचा पट्टा काढून त्याचे पाय बांधले. तरुणाला एका झाडाला बांधून आरोपींनी तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. लँड फॉर जॉब : लालू अन् तेजप्रतापसह 8 आरोपी आज कोर्टात हजर राहणार नवी दिल्ली - लँड फॉर जॉब घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होत आहे. आता या प्रकरणात लालू यादव, तेजस्वी आणि तेज प्रताप यादव यांच्यासह आठ आरोपींना सोमवारी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर केले जाणार आहे. ईडीच्या पुरवणी आरोपपत्रावर राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने सर्वांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. इंडिगोची विमान सेवा दुसऱ्या दिवशी सुरळीत नवी दिल्ली - एअरलाइन कंपनी इंडिगोची सेवा रविवारी पूर्ववत झाली. काही तांत्रिक कारणांमुळे कंपनीच्या प्रवासी सेवेला फटका बसला. प्रवाशांना अनेक तास विमानतळावर प्रतीक्षेत घालवावी लागली. शनिवारी रात्री कंपनीने सेवा सुरळीत झाल्याची माहिती दिली. या विमान कंपनीची दररोज 2 हजारांहून जास्त उड्डाणे आहेत. प्रयागराजमध्ये महाकुंभ, बोधचिन्ह केले जाहीर प्रयागराज - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते रविवारी प्रयागराज महाकुंभाचा लोगो, ॲप व संकेतस्थळ जाहीर केले. महाकुंभ काळात प्रयागराजच्या सीमेवर मांस-मद्य विक्रीवर बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. आखाड्यांच्या ‘शाही’ स्नानाला आता ‘राजसी’ स्नान असे संबोधले जाईल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article