दिव्य मराठी अपडेट्स:गतवर्षीपेक्षा 10 दिवस उशिराने मान्सून परतला; आता बरसल्यास ईशान्य मान्सून किंवा हिवाळी पाऊस

2 days ago 1
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स गतवर्षीपेक्षा 10 दिवस उशिराने मान्सून महाराष्ट्रासह देशातून परतला माघारी नाशिक - महाराष्ट्रासह उर्वरित देशातून मंगळवारी (15 ऑक्टाेबर) मान्सून पूर्णपणे परतला. महाराष्ट्रातून गतवर्षापेक्षा यंदा तो दहा दिवस उशिराने परतला आहे. 2023 ला तो 5 ऑक्टोबरला परतला होता. परतीचा मान्सून नंदुरबार जिल्ह्यात 14 आॅक्टोबरपर्यंत थबकला होता. 15 ऑक्टोबरला मात्र महाराष्ट्र- मध्य प्रदेशच्या सीमेला लागून असलेला भाग, छत्तीसगड, पूर्व ओडिशा, तेलंगण, उत्तर कर्नाटकसह संपूर्ण देशातून एका दिवसात त्याने निरोप घेतला. गेल्या आठवड्यापासून बंगालच्या उपसागरात ताकदवान तसेच वेगवान पूर्वीय वाऱ्यांच्या प्रणालींमुळेच महाराष्ट्र, मध्य प्रदेशचा काही भाग, छत्तीसगड, पूर्व ओरिसा, तेलंगणा, उत्तर कर्नाटकसह महाराष्ट्रातून मान्सून माघारी परतला आहे. मात्र तरीही 18 ते 22 ऑक्टोबर या पाच दिवसांच्या कालावधीत मराठवाड्यासह राज्यभरात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाचे हे दुसरे आवर्तन असून ते चार दिवस आधी येणार आहे. महाराष्ट्रातून मुख्य मान्सून परतला. मात्र, आता आगामी तीन महिने पाऊस झाल्यास तो ईशान्य मान्सून किंवा हिवाळी पाऊस राहणार आहे. 7 विमानांत बॉम्बच्या धमक्या, सर्व खाेट्या नवी दिल्ली - देशातील विविध विमानतळांवरून संचालित होणाऱ्या सात विमानांना मंगळवारी बॉम्बने उडवून देण्याच्या धमक्या मिळाल्या. मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म एक्सवर या धमक्या देण्यात आल्या होत्या. मात्र, या धमक्या खोट्या असल्याचे सिद्ध झाले. सोमवारीही तीन आंतरराष्ट्रीय उड्डाणांना अशा प्रकारच्या बनावट धमक्या दिल्यानंतर शेकडो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. या धमकीनंतर शिकागोला जाणारे विमान कॅनडाकडे वळवावे लागले. कॅनडाच्या दुर्गम भागात असलेल्या इकलात विमानतळावर ते उतरणार होते. दुसरीकडे, नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या तक्रारीनंतर ज्या ज्यावरून ही धमकी मिळाली ते एक्स हँडल निलंबित करण्यात आले आहे. नांदेडला राष्ट्रीय क्रीडा‎स्पर्धेसाठी आढावा बैठक‎ नांदेड‎ - राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी जिल्हा‎क्रीडा कार्यालयामार्फत मंगळवारी‎पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली.‎जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी‎अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.‎ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व‎राज्यस्तरीय महोत्सवाच्या‎आयोजनाबाबत अधिकाऱ्यांनी‎नियोजन मांडले. राज्यस्तरीय क्रीडा‎स्पर्धा आर्चरी, बास्केटबॉल, विश्व‎बेसबॉल, बुद्धिबळ व सेपक टकरा,‎विनाअनुदानित राज्यस्तरीय खेळ,‎व्हॉलीबॉल 19 वर्षे गटातील मुले‎मुली बेसबॉल, बुद्धिबळ स्पर्धेच्या‎आयोजनाची जबाबदारी नांदेड‎जिल्ह्याकडे देण्यात आलेली आहे.‎त्याअनुषंगाने विविध कामांचा‎आढावा घेण्यात आला. सांस्कृतिक‎कार्यक्रमांमध्ये समूह लोकनृत्य,‎लोकगीत स्पर्धा होईल.‎ ‘मोफत रेवडी’वरून केंद्रासह निवडणूक आयोगाला नोटीस नवी दिल्ली - निवडणुकीत मोफत भेटवस्तू किंवा रेवड्या (आश्वासने) वाटप करण्याच्या घोषणेवरून दाखल ताज्या याचिकेवर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टाने नोटीस बजावली आहे. सोबतच नवी याचिका प्रलंबित याचिकांसोबत जोडण्यात आली आहे. याचिकेनुसार, यामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक बोजा पडतो. म्हणून यावर तातडीने बंदी घालण्यात यावी. यापूर्वी न्यायालय निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांकडून मोफत रेवड्या वाटप करण्याच्या आश्वासनाच्या ट्रेंडविरोधातील याचिकांवर सुनावणी घेण्याबाबत सहमत झाले होते मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 29 हजार रुपये बोनस जाहीर मुंबई - विधानसभेच्या तोंडावर मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना यंदा 29 हजार रुपये दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा तीन हजार रुपये अधिक रक्कम आहे. मुंबई महापालिकेत एक लाख महापालिका अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे दिवाळी बोनसमुळे मनपा तिजोरीवर अंदाजे 290 कोटी रुपयांचा बोजा पडेल. बेस्टच्या 25 हजार कर्मचाऱ्यांनाही 29 हजार बोनस देण्यात येणार आहे. त्यापोटी सुमारे 75 कोटींचा बोजा पडणार आहे. मागील वर्षी मनपा कर्मचाऱ्यांना 26 हजार रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा 30 हजार रुपये बोनस देण्याची मागणी कामगार, कर्मचारी संघटनांनी केली होती. कल्याणमध्ये फलक फाडून राजकीय, सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न कल्याण - कल्याण शहरात गेल्या आठवड्यापासून विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांवर लावलेले फलक फाडण्याची जोरदार चढाओढ लागली आहे. भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण पश्चिम मतदारसंघातील उद्धवसेनेचे इच्छुक उमेदवार साईनाथ तारे, मोहने येथील संध्या साठे यांनी नवरात्रोत्सवानिमित्त लावलेले फलक अज्ञातांनी फाडून राजकीय आणि सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञातांंविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. "पेट’ परीक्षेचा निकाल जाहीर‎ छत्रपती संभाजीनगर - ‎डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा‎विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या‎पीएच.डी प्रवेश परीक्षेचा‎(पेट-सहा) निकाल मंगळवारी‎सायंकाळी जाहीर करण्यात आला‎आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार‎जिल्ह्यांत 11 केंद्रांवर 3 ऑक्टोबर‎रोजी ’पेट’घेण्यात आली. या‎चाचणीस 9 हजार 166 विद्यार्थी‎बसले होते.‎ ’ओएमआर’ पद्धतीने या चाचणीचे‎पेपर तपासण्यात आले. ’पेट’च्या‎निकालासंदर्भात काही आक्षेप‎असतील तर 16 ते 21 ऑक्टोबर‎यादरम्यान ’पेट’ संकेतस्थळावर‎दिलेल्या फॉरमॅटमध्ये नोंदवायचे‎ आहेत.‎ एसबीआयने कमी केले व्याजदर, कर्जे स्वस्त मुंबई - एसबीआयने कर्जावरील एक महिन्याच्या एमसीएलआर व्याजदरांत 0.25 टक्के कपात केली आहे. हे दर 8.45 टक्क्यांवरून कमी करत 8.20% करण्यात आले आहेत. नवे दर 15 ऑक्टोबरपासून लागू केल्याचे बँकेने सांगितले. एमसीएलआरचे इतर दर 8.20% ते 9.1% दरम्यान असतील. वक्फ जेपीसीची बैठक - लोकसभा अध्यक्षांकडे विरोधी खासदारांची तक्रार नवी दिल्ली - विरोधी खासदारांनी मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून वक्फ(दुरुस्ती) विधेयकाचा अभ्यास करणाऱ्या संयुक्त समितीच्या बैठकीत पॅनलचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्याद्वारे ‘संसदीय आचारसंहितेच्या घोर उल्लंघनावर’ चिंता व्यक्त केली. हे पत्र कर्नाटक राज्य अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष अनवर मणिप्पाडी यंाच्या युक्तिवादावर समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकण्याच्या एका दिवसानंतर आला आहे. पत्रावर विरोधी सदस्य गौरव गोगोई, सैय्यद नसीर हुसेन, हम्रान मसूद(सर्व काँग्रेस), असुदुद्दीन ओवेसी(एआयएमआयएम) आदी सदस्यांच्या सह्या आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article