दिव्य मराठी अपडेट्स:जानेवारीत बँकॉकला फुले-शाहू आंबेडकरी विश्व‎‎साहित्य संमेलन; संमेलनाध्यक्षपदी डॉ. कांबळे‎

3 days ago 2
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी मुंबई - माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सोमवारी मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाल्याचे वृत्त आहे. नियमित तपासणीसाठी त्यांना नेले होते. मात्र रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळल्याने त्यांच्यावर लगेच अँजिओप्लास्टी केल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. परंतु ठाकरे कुुटुंबीयांकडून किंवा पक्षातून या वृत्ताला कुणीही दुजोरा दिला नाही. आदित्य ठाकरे यांनी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यात त्यांनी म्हटले की, ‘सकाळी उद्धव ठाकरे रिलायन्स रुग्णालयात पूर्वनियोजित तपासणीसाठी दाखल झाले आहेत. तुमच्या शुभेच्छांसह सर्वकाही ठीक आहे, पुन्हा कार्यरत होण्यासाठी आणि तुमच्या सेवेसाठी पूर्णपणे तयार आहेत.’ नवनीत राणा यांना चारदिवसांत दुसरे धमकीपत्र अमरावती - अमरावतीच्या माजी खासदार, भाजप नेत्या नवनीत राणा यांना चार दिवसांतच पुन्हा धमकीचे दुसरे पत्र मिळाले. पूर्वीच्या पत्रात त्यांना सामूहिक अत्याचाराची धमकी देत 10 कोटी खंडणी मागितली होती. सोमवारच्या पत्रातही पैसे तर द्यावेच लागेल, असा उल्लेख करून आक्षेपार्ह भाषा वापरल्याची माहिती त्यांचे स्वीय सहायक विनोद गुहा यांनी दिली. या पत्रातही धमकी देणाऱ्याने आपले नाव आमिर असे लिहिले. गुहा यांनी पोलिसात तक्रार देत संरक्षण वाढवण्याची मागणी केली आहे. राणा यांना सध्या वाय दर्जाची सुरक्षा आहे. त्यांच्या घराभोवतीही सुरक्षा वाढवली आहे. सुरक्षेत आणखी वाढ करू, असे डीसीपी गणेश शिंदे यांनी सांगितले. आ. जयस्वालांना उमेदवारी, शिंदेसेनेचा भाजपला धक्का नागपूर - महायुतीत जागावाटपाचा निर्णय होण्याधीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पारशिवनी येथील कार्यक्रमात आमदार आशिष जयस्वाल यांची रामटेकमधून उमेदवारी जाहीर करून भाजपला धक्का दिला आहे. 2019 मध्ये युतीधर्माचे पालन न करता जयस्वाल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. यापूर्वी तीनदा ते शिवसेनेकडून निवडून आले होते. महायुतीची सत्ता आल्यानंतर त्यांनी शिंदेसेनेला पाठिंबा दिला होता. देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंशी निकटचे संबंध असल्याचा फायदा त्यांना नेहमीच झाला. दुसरीकडे लोकसभेला रामटेकमधून काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे विजयी झाल्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. काँग्रेसकडून इच्छुक माजी मंत्री राजेंद्र मुळक यांची उमेदवारी श्यामकुमार यांच्या पत्नी रश्मी बर्वे यांनी जाहीर केली. त्याला उद्धवसेनेचे जिल्हा उपप्रमुख प्रेम रोडेकर यांनी आक्षेप घेतला आहे. फुले-शाहू-आंबेडकरी विश्व साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. कांबळे‎ छत्रपती संभाजीनगर - जानेवारी महिन्यांत बँकॉक‎‎येथे फुले-शाहू आंबेडकरी विश्व‎‎साहित्य संमेलन होत आहे. या‎‎ संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ.‎‎ ऋषिकेश कांबळे यांची निवड ‎‎करण्यात आली आहे. डॉ. ‎‎बाबासाहेब आंबेडकर साहित्य‎ परिषद फुले-शाहू आंबेडकरी साहित्य विचारांचा‎ प्रसार-प्रसार करत आहे. पहिल्यांदाच विश्व साहित्य‎ संमेलनाचे आयोजन परदेशात केले असून 5 जानेवारी‎ रोजी हे संमेलन होणार आहे. यात 100 हून अधिक‎साहित्यिक सहभागी होतील. साहित्यिक डॉ.‎ ऋषिकेश कांबळे यांची संमेलनाध्यक्षपदी सर्वानुमते‎ निवड करण्यात आली.‎ दिल्लीत 1 जानेवारीपर्यंत फटाक्यांवर घातली बंदी नवी दिल्ली - थंडीच्या काळात प्रदूषण वाढण्याची भीती लक्षात घेऊन दिल्ली सरकारने फटाक्यांचे उत्पादन, त्याचा साठा आणि त्यांच्या वापरावर बंदी घातली आहे. 1 जानेवारी 2025 पर्यंत ही बंदी लागू राहणार आहे. हे निर्बंध ऑनलाइन फटाक्यांच्या विक्रीसह सर्व प्रकारच्या फटाक्यांवर लागू राहतील. प्रदूषणाची पातळी कमी करणे असा त्याचा उद्देश आहे. किरकाेळ महागाईचा दर 5.49%, वर्षात सर्वाधिक मुंबई - देशात घाऊक दर निर्देशांकावर आधारित महागाई दर नऊ महिन्यांत सर्वाेच्च पातळीवर गेला आहे. यंदा सप्टेंबरमध्ये महागाई दर 5.49 टक्के हाेता. आॅगस्टमध्ये 3.65 टक्के हाेता. ठाेक मूल्य चलन दरही वाढून 1.84 टक्के झाला. आॅगस्टमध्ये ताे 1.31 टक्के हाेता. अन्नधान्याचे दर वाढल्यामुळे महागाईत वाढ झाली. म्हणूनच रिझर्व्ह बँक डिसेंबरमध्ये व्याजदरात घट करण्याची शक्यता धूसर झाली आहे. आॅक्टाेबरच्या चलन धाेरणाच्या आढाव्यात केंद्रीय बँकेने महागाई स्थिर राहिल्यास डिसेंबरपासून व्याजदरात घट केली जाईल,असे म्हटले हाेते. आरबीआयने एप्रिल 2022 मध्ये शेवटची व्याजदर कपात केली हाेती. जहाल माओवादी दांपत्याचे आत्मसमर्पण नागपूर- शासनाने दहा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलेल्या जहाल माओवादी दांपत्याने गडचिरोली पोलिस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले. यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. वरुण राजा मुचाकी ऊर्फ उंगा ऊर्फ मनीराम ऊर्फ रेंगू, दलम कमांडर (भामरागड दलम, वय 27) व त्याची पत्नी रोशनी विज्या वाचामी, दलम सदस्य (भामरागड दलम, वय 24) अशी आत्मसमर्पण केलेल्यांची नावे आहेत. 2005 पासून जाहीर केलेल्या योजनेमुळे आजपर्यंत एकूण 674 जणांनी आत्मसमर्पण केले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article