दिव्य मराठी अपडेट्स:शरद पवारांनी आकाशातसुद्धा राज्य केले असते, त्यांच्याएवढा पापी माणूस या जगात नाही- सदाभाऊ खोत

4 days ago 2
नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर... अपडेट्स ..तर शरद पवारांनी आकाशात राज्य केले असते ​​​​​​शरद पवार म्हणजे अलीबाबा, त्यांच्या एवढा पापी या जगात कोणी नाही अशी टीका सदाभाऊ खोत यांनी त्यांच्यावर केली. शरद पवारांना मानावे लागेल, आकाश खाता येत नाही म्हणून त्यांनी शिल्लक ठेवले, नाहीतर त्यांनी आकाशात सुद्धा राज्य केले असते, असा टोला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. बहिणींकडे वाकडी नजर‎केल्यास खैर नाही- शिंदे‎ आमच्या आया-बहिणींकडे वाकडी ‎‎नजर करणाऱ्यांची खैर नाही, असा ‎‎इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. ‎‎लाडकी बहीण योजनेच्या‎माध्यमातून सव्वादोन कोटी‎महिलांच्या खात्यावर, आतापर्यंत 17 ‎‎हजार कोटी रुपये जमा केले आहे.नवा मोंढा मैदानावर रविवारी महिला ‎‎सशक्तीकरण मेळावा झाला,‎त्यावेळी ते बोलत होते. खासदार‎ अशोक चव्हाण, हळद संशोधन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केंद्राचे अध्यक्ष व माजी खासदार ‎हेमंत पाटील उपस्थित होते.‎ मुंबई हावडा एक्सप्रेस बॉम्बने उडवू, रेल्वेला मिळाली धमकी​​​​​​​ ​​​​​​​रेल्वे सुरक्षा बलाने दिलेल्या माहितीनुसार, हावडा रेल्वे स्थानकावरुन मुंबईकडे येणाऱ्या 12809 या हावडा-मुंबई मेलमध्ये टायमर बॉम्ब ठेवला आहे. नाशिक स्थानक येण्याच्या आधी या गाडीत मोठा बॉम्बस्फोट होईल, असा मेसेज रेल्वे विभागाला ट्विटरवरुन मिळाला होता. या धमकीमुळे रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली होती. या धमकीनंतर रेल्वे सुरक्षा बल व बॉम्बशोधक पथकाकडून मुंबई हावडा एक्सप्रेसची तपासणी करण्यात आली. मात्र रेल्वेमध्ये काहीही न सापडल्याने ही ट्रेन पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली आहे. मुंबई हावडा मेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. ​​​​​​​

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article