दिव्यांग सोशल फाउंडेशनतर्फे जागतिक पांढरी काठी दिन:जिल्ह्यातील अंध विद्यार्थ्यांना पांढरी काठी, ब्रेल बुक्स व शिष्यवृत्तीचे वाटप

2 days ago 2
येथील दिव्यांग सोशल फाउंडेशन, देशमुख महिला मंडळ, वैजयंती माला ग्रुप व श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने १५ ऑक्टोबर २०२४ रोजी जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिन झाला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील अंध विद्यार्थ्यांना पांढरी काठी, ब्रेल बुक्स व शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. दिवाळीनिमित्त दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या दिवाळी पूजा किटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ .रामेश्वर भिसे शिवाजी महाविद्यालय अकोला, दिव्यांग सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विशाल कोरडे, देशमुख महिला मंडळाच्या नयना देशमुख, पौर्णिमा देशमुख, सीमाताई देशमुख, कविता ढोरे, डॉ.छाया देशमुख,भारती शेंडे, मीनाक्षी फिरके व वैजयंती ग्रुपचे सदस्य उपस्थित होते. डॉ.रामेश्वर भिसे यांनी अध्यक्षीय भाषणात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोलाच्या माध्यमाने भारतात व भारताबाहेरही दिव्यांगांना सहकार्य करण्यासाठी जे उपक्रम चालत आहेत. त्या सर्व उपक्रमांना श्री शिवाजी महाविद्यालय अकोला तर्फे नेहमीच सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. देशमुख महिला मंडळातर्फे नेहमीच दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला या संस्थेला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,असे मत पुष्पा देशमुख यांनी व्यक्त केले. दिव्यांग बांधवांनी तयार केलेली दिवाळी पूजा किट खरेदी करून दिव्यांगांना एक हात सहकार्याचा द्यावा, असे आवाहन नयना देशमुख यांनी केले.वभारती शेंडे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनला २ पॉपकॉर्न मशीन देणगी म्हणून देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनामिका देशपांडे यांनी केले. कविता ढोरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अस्मिता मिश्रा, विशाल भोजने,अमित सोळंके, ईश्वरी गावंडे, प्रेरणा वैरागडे,मनिषा देशमुख, शारदा देशमुख, कल्पना देशमुख, भाग्यश्री देशमुख, व देशमुख महिला मंडळाने सहकार्य केले. अकोल्यात विविध ठिकाणी स्टॉल लावला जात असून विविध सामाजिक संस्था, महिला मंडळ व मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे. ३०० दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी संस्थेतर्फे विविध दिवाळी उत्पादने तयार केली असून, अधिकाधिक लोकांनी ही दिवाळी उत्पादने खरेदी करून दिव्यांगांच्या शिक्षण, रोजगार व आरोग्यासाठी सहकार्य करावे. तसेच ज्या दिव्यांगांना रोजगार प्रशिक्षण व ब्रेल बुक्स हवे आहेत. त्यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनच्या ९४२३६५००९० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. छाया देशमुख यांनी केले आहे. दिव्यांगांना रोजगार देण्यासाठी दिवाळी उत्पादने

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article