मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील 17 गावांच्या प्रचार दौर्यात आंबे येथे बोलताना अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर. Pudhari Photo
Published on
:
14 Nov 2024, 11:38 pm
Updated on
:
14 Nov 2024, 11:38 pm
मोहोळ : राष्ट्रवादी पक्षाचे शरद पवार यांनी मला शब्द दिलेला असताना माझा पत्ता कट करून ऐन वेळी धनदांडग्या उमेदवारांनी पैशाच्या जोरावर उमेदवारी मिळवली आहे. त्यांना जनताच योग्य धडा शिकवेल. असा आरोप मोहोळ विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यांनी विरोधकांवर केला.
पंढरपूर तालुक्यातील 17 गावांचा दौरा करत असताना आंबे येथे ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी दोन्ही उमेदवारांचा खरपूस समाचार घेत तालुक्यातील नेते मंडळींवर टीकेची तोफ डागली. मोहोळ विधानसभेची राखीव जागा असूनसुद्धा मतदार संघातील उमेदवारांना संधी दिली जात नाही, ही शोकांतिका आहे. आम्ही भूमीपुत्र म्हणून लोक मला ओळखतील अशी अपेक्षा असून कोटीची उड्डाणे घेऊन उमेदवारी घेणार्या उमेदवारांना घरचारस्ता दाखवल्या शिवाय राहणार नाहीत. भूमीपुत्र म्हणून माझी मतदारसंघात चांगली ओळख आहे. चांगली प्रतिमा असणारा उमेदवार म्हणून मतदार माझ्या पाठीशी आहे.
संजय क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे राजू खरे यांना पाठिंबा दिल्याच्या बातम्या पसरत आहेत. याबाबत बोलतला ते म्हणाले, मी कोणालाही पाठिंबा दिलेला नसून देणारही नाही. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. सहा महिन्यांपासून मी मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर लोकांनी मला तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्याची विनंती केली. त्यानुसार मी लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पवार यांच्या उपस्थितीत हजारो कार्यकर्ते व मतदारांच्या साक्षीने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून पाठिंबा दिला.
लोकसभेच्या निवडणूकीत प्रणिती शिंदे यांना मोहोळ तालुक्यातून 65 हजारांचा लीड मिळवून दिला. त्यावेळी अनगरकरांसह सर्व विरोधक महायुतीचा प्रचार करत होते. पवार साहेबांनी मला शब्द दिलेला असताना आता मात्र माझा पत्ता कट करून ऐन वेळी धनदांडग्या उमेदवारांनी पैशाच्या जोरावर उमेदवारी मिळवली आहे. त्यांना जनता योग्य धडा शिकवेल.असा घणाघात मोहोळ विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार संजय क्षीरसागर यांनी विरोधककांवर केला.