धानोऱ्यात गुलाल उधळण्यावरून वादावादी:दगडफेकीत 8 जखमी, दुर्गा विसर्जन मिरवणुकीला गालबोट, महिलांनी मांडला अडावद पोलिस ठाण्यात ठिय्या

4 days ago 3
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रविवारी दुर्गा विसर्जन दरम्यान काही दुर्गा मंडळात गुलाल फेकण्याच्या वादावादीवरून दगडफेक करण्यात आली. यात 8 जण गंभीर जखमी झाले तर एक जण किरकोळ जखमी झाला. मागील तीन वर्षात विसर्जन मिरवणुकीत दगडफेकीची ही दुसरी घटना आहे.या पार्श्वभूमीवर येथे गुन्हा दाखल व्हावा यासाठी ठिय्या मांडला आहे, दोन्ही गटाचे महिला व पुरुष मोठ्या संख्येने हजर झाले. गावात तेरा दुर्गा मंडळ विसर्जन मिरवणूक शांततेत सुरू असताना रात्री नऊ वाजेच्या सुमारास सतपंथ ज्योत मंदिर परिसर व गांधी चौक भागात गुलालाची उधळण सुरू असताना वाद झाले. त्यावरून दगडफेक करण्यात आली. यात किशोर चौधरी, मंथन दिनकर चौधरी,ललित कोळी, मनोज आधार साळुंके, चेतन महाजन हे गंभीर जखमी झाले तर मुस्तफा तडवी ये अडावद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. दगडफेकीत 6 जखमी, गावात तणाव धानोरा (ता. चोपडा) येथे दुर्गा विसर्जन मिरवणुकीला दगडमिश्रित गुलाल फेकल्याने सहा जण जखमी झाले. काही वेळ गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. दरम्यान, रात्री सव्वादहा वाजता मिरवणूक चोख बंदोबस्तात पार पडली. दुर्गा विसर्जन मिरवणुकीत वर्ध्यात लाठीमार दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीची वेळ रात्री 10 वाजेपर्यंत देण्यात आली असताना पोलिसांनी डीजेसह वाद्य बंद करण्याच्या सूचना दिल्याने वर्ध्यात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, पोलिसांकडून मंडळातील काही सदस्यांवर लाठीमार करण्यात आला. बोरगाव मेघे, सिंदी मेघे, सावंगी मेघे, पिंपरी मेघे रामनगर, म्हसाळा व आर्वी नाका या परिसरातील दुर्गामातेची विसर्जन मिरवणूक 13 ऑक्टोबर रोजी काढण्यात आली. यासाठी रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी असताना डीजे व ढोल वाजवले जात असल्यामुळे ठाकरे मार्केट परिसरात पोलिसांनी डीजे बंद करण्याच्या सूचना दिल्याने मंडळ पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला असता राडा झाला. यामध्ये पोलिसांनी मिरवणुकीतील काही सदस्यांवर लाठीमार करण्यात आला. नंतर पोलिस बंदोबस्तात पवनार येथील धाम नदीच्या पात्रात विसर्जन करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article