धामणगावच्या निकालाला लागणार सर्वाधिक वेळ:27 फेऱ्यांवाला एकमेव मतदारसंघ तिवसा; अचलपुर, मोर्शीसाठी 23 फेऱ्यांची आखणी
5 hours ago
1
मतदान केंद्रांची संख्या सर्वाधिक ३७८ असल्याने धामणगाव रेल्वे मतदारसंघाचा निकाल सर्वात उशीरा लागेल. या मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणेला २७ फेऱ्या पूर्ण कराव्या लागणार आहेत. दरम्यान अमरावती आणि बडनेरा या दोन्ही मतदारसंघासाठी २५ फेऱ्यांची वाट पहावी लागणार असून पहिला निकाल दुपारी दीड वाजेपर्यंत घोषित होईल, असा विश्वास संबंधित यंत्रणेने व्यक्त केला आहे. राज्यातील इतर मतदारसंघाप्रमाणेच अमरावती जिल्ह्यातील आठही मतदारसंघांची मतमोजणी आगामी शनिवार, २३ नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघाच्या मुख्यालयी मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या संख्येवरुन त्या-त्या मतदारसंघाची मतमोजणी किती फेऱ्यांमध्ये पूर्ण होईल, हे ठरत असते. या निकषाच्या आधारे सर्वाधिक मतदान केंद्र असलेल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघाची मतमोजणी पूर्ण व्हायला तब्बल २७ फेऱ्या कराव्या लागणार आहेत. त्याचवेळी मेळघाटसाठी २६, बडनेरा, अमरावती, दर्यापुरसाठी प्रत्येकी २५ तर तिवसा, अचलपुर आणि मोर्शीत प्रत्येकी २३ फेऱ्या होतील. मतमोजणीसाठी प्रत्येक केंद्रावर १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याअर्थी एका फेरीत १४ इव्हीएममधील मते मोजली जाणार आहेत. मुळात जेवढी मतदान केंद्रे तेवढ्याच इव्हीएम असल्याने १४ च्या पटीत त्यातील मतमोजणी पुढे जाईल. या सूत्रानुसारच प्रत्येक मतदारसंघासाठी मतमोजणीच्या किती फेऱ्या होतील, हे निश्चित झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील सर्व आठही मतदारसंघात बुधवार, २० नोव्हेंबरला निवडणूक पार पडली. जिल्ह्यात सरासरी ६५.४६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान त्यांनी दिलेला कौल कुणाच्या बाजूने आहे, हे मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे. अमरावती जपणार आपला विक्रम लोकसभा निवडणुकीच्या वेळी अमरावती मतदारसंघात समाविष्ट असलेल्या सहाही विधानसभा मतदारसंघांची मतमोजणी अमरावतीच्या लोकशाही भवनात पार पडली होती. यामध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघाने सर्वात आधी मतमोजणी पूर्ण करुन विक्रम स्थापन केला होता. दरम्यान हा विक्रम यावेळीही कायम राखला जाईल, अशी तयारी निवडणूक निर्णय अधिकारी अनिल भटकर यांनी केली आहे. त्यांच्यामते शेवटची फेरी एक ते दीडच्या सुमारास पूर्ण होईल. कुठली मतमोजणी कुठे ? मतदारसंघ मतमोजणीचे स्थळ धामणगाव रेल्वे शासकीय आयटीआय, विरुळ रोड, चांदूर रेल्वे बडनेरा लोकशाही भवन, विद्यापीठ रोड, अमरावती अमरावती लोकशाही भवन, विद्यापीठ रोड, अमरावती तिवसा तहसील कार्यालयाची नवी इमारत, तिवस दर्यापुर कृऊबास कार्यालय, दर्यापुर मेळघाट नवे प्रशासकीय भवन, धारणी अचलपुर कल्याण मंडपम, परतवाडा मोर्शी शासकीय धान्य गोदाम, मोर्शी
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)