घर बांधकामासाठी बांधलेल्या टाकीत पडून बहीण- भावाचा मृत्यूpudhari file photo
Published on
:
04 Dec 2024, 8:21 am
Updated on
:
04 Dec 2024, 8:21 am
नंदुरबार | नंदुरबार शहरातील होळ शिवार परिसरात असलेल्या जगतापवाडी जवळील द्वारका नगरमध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. दरम्यान हे दोन्ही मुले बेपत्ता असल्याची तक्रार शहरातील पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसांपूर्वी दाखल होती.
राजेश्वरी चंद्रसिंग पावरा (७) व शंकर पावरा (५) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या बहीण भावाची नावे आहेत. दरम्यान नंदुरबार शहरातील जगतापवाडी परिसरात असलेल्या द्वारका नगर या भागात नवीन घराचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाच्या ठिकाणी देखरेखीसाठी वॉचमन म्हणून काम करणाऱ्या राखलदाराची ही दोन्ही मुले आहेत.