नगर रोडवर स्कॉर्पिओने तीन वाहनांना उडवले:अडीच वर्षांच्या चिमुकल्यासह तीन जण जखमी, सलग तिसऱ्या दिवशी हिट अँड रन

3 hours ago 1
निराला बाजार, ठाकरेनगरनंतर सलग तिसऱ्या दिवशी शहरात हिट अँड रन प्रकरण घडले. नगर रोडवर पांढऱ्या स्कॉर्पिओचालकाने ३ वाहनांना एकापाठोपाठ धडक दिल्याची घटना सोमवारी (३० सप्टेंबर) पाच वाजेच्या सुमारस घडली. यात आई-वडिलांसोबत दुचाकीवरून जाणारा अडीच वर्षांचा मुलगा आणि इतर वाहनांतील तिघे जखमी झाले आहेत. चिमुकल्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छावणी ठाण्यात या घटनेची नोंद केली असून स्कॉर्पिओचालक फरार झाला आहे. होलीक्रॅास येथे स्कॉर्पिओ चालकाने एका मोपेडला धडक दिली. या धडकेत चालक अब्दुल वासेफ (२८), अब्दुल अतिस व अब्दुल अतिस जखमी झाले. या दोघांना नागरिकांनी घाटी रुग्णालयात दाखल केले. वाळूज रोडवर महालक्ष्मी माता मंदिर येथे दुचाकीला धडक दिली. यात अडीच वर्षांचा चिमुकला जखमी झाला. पुढे चारचाकीला धडक दिली. घटनेनंतर नुकसान झालेल्या कारचालकांनी छावणी ठाण्यात तक्रार दिली. निराला बाजार प्रकरणात कारचालक सापडेना निराला बाजार रोडवर शनिवारी (२८ सप्टेंबर) दुपारी अडीचच्या सुमारास भरधाव कारने ८ वाहनांना उडवले होते. त्यात दोघे जखमी झाले होते. एमएच २१ एएक्स १४८१ ही चारचाकी आहे. अद्याप यातील आरोपी फरार आहे. ठाकरेनगरातील एपीआय कॅार्नर ते जिजाऊ चौक या रस्त्यावर रविवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास अविनाश शिंदे (२२, रा. मुकुंदवाडी) हा मद्यधुंद अवस्थेत चारचाकी (एमएच ४६ एक्स ४४७२) घेऊन घरी जात होता. या वेळी त्याने ३ वाहनांना उडवले होते. यात वाहनांचा चक्काचूर झाला होता. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी अविनाश शिंदे याला अटक केली आहे. या चारचाकीत अविनाशचे चार मित्र होते. ते अद्याप फरार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article