घराबाहेर जात असताना गोविंदाने स्वत:ची बंदूक हातात घेतली आणि त्याचवेळी त्याच्या हातून मिसफायर झाल्याचं कळतंय. घरात परवाना असलेली बंदूक हातात घेतली असताना त्यातून मिसफायर झालं.
Govinda
अभिनेता गोविंदाकडून मिसफायर झाल्याची बातमी समोर येत आहे. गोविंदाच्या स्वत:च्या बंदुकीतून गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली. पहाटे पाच वाजता ही घटना घडली आहे. घराबाहेर जात असताना गोविंदाने स्वत:ची बंदूक हातात घेतली आणि त्याचवेळी त्याच्या हातून मिसफायर झाल्याचं कळतंय. घरात परवाना असलेली बंदूक हातात घेतली असताना त्यातून मिसफायर झालं. यामुळे त्याच्या पायाला गोळी लागली. गोविंदाला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. गोविंदाची प्रकृती स्थित असल्याचं कळतंय.