4 वर्षांपासून गुंगारा देणारे दोघे अटकेत:खून करून झाले होते पसार, पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

2 hours ago 1
पुणे शहरात हडपसर भागात 4 वर्षांपूर्वी एकाचा खून करुन पसार झालेल्या दोघांच्या गुन्हे शाखेने अखेर मुसक्या आवळल्या आहेत. हे आरोपी मागील चार वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत होते. शुभम कांबळे, आनंद माने अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हडपसर भागात बसवराज कांबळे (रा. गंगानगर, फुरसुंगी) यांचा 4 वर्षांपूर्वी आरोपी हेमंत नाईकनवरे आणि साथीदारांनी खून केला होता. खून प्रकरणात पोलिसांनी नाईकनवरे आणि साथीदारांना अटक केली होती. मात्र, खून प्रकरणातील सहआरोपी कांबळे आणि माने पसार झाले होते. गेले चार वर्ष ते ओळख लपवून वेगवेगळ्या भागात वास्तव्य करत होते. गुन्हे शाखेच्या युनिट पाचकडून त्यांचा शोध घेण्यात येत होता. दोघे जण गंगानगर स्मशानभूमी परिसरात थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी विनोद शिवले, अकबर शेख, अमित कांबळे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. चौकशीत दोघांनी खून केल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युवराज हांडे, सहायक निरीक्षक कृष्णा बाबर, पोलीस कर्मचारी विनोद शिवले, अकबर शेख, राजस शेख, प्रमोद टिळेकर, तानाजी देशमुख, अमित कांबळे, उमाकांत स्वामी, प्रताप गायकवाड, शशिकांत नाळे, पृथ्वीराज पांडुळे यांनी ही कारवाई केली. रस्ता ओलांडताना तरूणाचा मृत्यू रस्ता ओलांडताना भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत मुळच्या उत्तरप्रदेश येथील तरूणाचा येरवडा येथील गुंजन चौकाजवळ अपघात मृत्यू झाला. दिनेश रामफेर कनोजिया (29, रा. सिध्दार्थनगर, उत्तरप्रदेश) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात दुचाकीस्वारावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नुरमोहमंद नजरमोहमंद मन्सुरी (39, रा. येरवडा, मुळ रा. उत्तरप्रदेश) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावेळी दिनेशला उपचारासाठी मदत न करता दुचाकीस्वार पळून गेला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article