नगर शहरात स्वतंत्र स्नेह मेळावा, विधानसभेसाठी आखली रणनीती:जिल्हा भाजपचे नेते, पदाधिकारी मेळाव्याला गैरहजर

3 days ago 3
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी-शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांनी सोमवारी अहिल्यानगर येथे समर्थकांचा स्वतंत्र स्नेह मेळावा घेतला. भाजपचे माजी नगरसेवक रामदास आंधळे वगळता इतर पदाधिकारी मात्र या मेळाव्याला गैरहजर होते. दरम्यान, याच मेळाव्यात आमदार मोनिका राजळे यांनी दहा वर्षांनंतर हा मेळावा होत असून बदललेल्या राजकीय परिस्थितीतून मी आमदार झाल्याचे सांगतानाच यापुढे तुमची साथ हवी आहे, असे भावनिक आवाहन केले. त्यांच्या या स्वतंत्र मेळाव्यातून राजकीय चर्चेला उधाण आले आहे. शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात सोमवारी रात्री आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत हा स्नेह मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी राजळे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात उपस्थित असलेल्या समर्थकांनी पाथर्डी शेवगाव मतदार संघात मंत्रिपद मिळावे यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. या मेळाव्यासाठी भाजपचे रामदास आंधळे, सचिन कुसळकर वगळता प्रमुख पदाधिकारी मात्र उपस्थित नव्हते. शिवाय बॅनरवरही पक्षाचे चिन्ह अथवा पदाधिकाऱ्यांचे छायाचित्र नव्हते.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article