प्रेम म्हणजे दोन आत्म्यांच मिलन. पण आजच्या युवा वर्गासाठी प्रेमाचा अर्थ काहीतरी वेगळाच आहे. ते संबंध बनवायला प्रेम समजतात. झारखंडच्या सरायकेलामध्ये अशीच एक घटना घडली. यात प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. कारण तिने संबंध बनवायला नकार दिला. प्रियकराने हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. पोलीस या प्रकरणात आरोपीचा शोध घेत आहेत. मंगळवारी अखेर आरोपीला अटक करण्यात आली. रोहित मुर्मूला अटक करण्यात आली आहे. रोहित युवतीचा बॉयफ्रेंड होता.
प्रेयसीने रोहितला शरीरसंबंधांसाठी नकार दिला. ते रोहितला सहन झालं नाही. त्याने सिमेंटच्या पोलला तिचं डोकं आपटून तिची हत्या केली. रोहितने मुलीला लग्नाचा आश्वासन दिलं होतं. ते तिला बुधवारी संध्याकाळी सरायकेला येथे घेऊन आला. तिला नदी किनारी घेऊन गेला. तिथे त्याला प्रेयसीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे होते. पण तिने नकार दिला. त्यावरुन दोघांमध्ये वादावादी झाली. रोहितने रागाच्या भरात प्रेयसीची हत्या केली. त्यानंतर तिथून तो फरार झाला.
त्यावेळी समजलं की….
काही गावकऱ्यांना मुलीचा मृतेदह दिसला. त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. मृतदेह अशा अवस्थेत होता की, त्याची ओळखही पटवता येत नव्हती. मग बेपत्ता तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी मुलीच्या नातेवाईकांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावलं. नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी मोबाइल कॉल डिटेल तपासले. त्यावेळी समजलं की, युवतीच शेवटच बोलणं रोहित बरोबर झालं होतं. पोलिसांनी त्यानंतर रोहितला त्याच्या घरातून पकडलं.
आरोपीला कोर्टात कधी हजर करणार?
पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी ठोस पुरावे म्हणून युवतीचा मोबाइल फोन, काळ्या रंगाची बाईक, चप्पल, रक्ताचे डाग असलेले सिमेंट पीलर जप्त केला आहे. पुढील कारवाई सुरु आहे. आज बुधवारी आरोपीला कोर्टात हजर केलं जाईल.