नवचैतन्य:दुर्गामाता दौडीत तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद, नामपूर येथे विजयादशमीस मागील चार वर्षापासून दौडीचे आयोजन

4 days ago 3
संभाजी भिडे गुरुजी प्रणित श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानसह विविध हिंदुत्ववादी संघटनांतर्फे विजयादशमीस धर्म जगवण्याचे बळ, शक्ती, इच्छाशक्ती देवीकडे मागण्यासाठी दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते. नामपूर येथील भवानीमाता मंदिरापासून दुर्गामाता महादौडला प्रारंभ झाला. योगायोग चौक, झेंडा चौक, मोक्षगंगा चौक, शनिमंदिर, आशिर्वाद चौक, नथुराम लेन, आदर्श चौक, दुर्गामाता चौक, शिवमनगर, आझाद हिंद चौक, राममंदिर, भवानी माता मंदिरात समारोप करण्यात आला. दौडमध्ये तरुण, तरुणींसह महिला, विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. "जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज की जय या घोषणांनी परिसर निनादला. तरुणांमध्ये हिंदूधर्म, संस्कृतीची जनजागृती व्हावी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी १९८२ पासून श्री शिवप्रतिष्ठान संघटनेने दुर्गामाता दौडची सुरुवात केली. गेल्या चार वर्षांपासून दुर्गामाता दौडचा उपक्रम राबवला जात आहे. शहराच्या विविध भागात भगवे फेटे बांधून, हातात शस्त्र घेऊन धारकऱ्यांसह विद्यार्थ्यांच्या घोषणांनी लक्ष वेधले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article