नव्या सोयाबीनलाच नव्हे जुन्यालाही भाव मिळेना:तेलाचे दर वाढले, मात्र सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव

8 hours ago 1
जिल्ह्यात सोयाबीन सोंगणी व काढणीची लगबग सुरू आहे. आगामी सण, उत्सवाचे दिवस असल्याने शेतकरी सोयाबीनची विक्री करत आहेत. त्यामुळे बाजारात आवक वाढली आहे. नवे सोयाबीनच नव्हे, तर जुन्या सोयाबीनलाही अकोल्यासह जिल्ह्यातील बाजार समित्यांत भाव मिळत नाही. एकरी उत्पादन खर्च जाता पदरी फार काही पडत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. केंद्र सरकारने क्रूड आणि रिफाइंड सूर्यफूल तेलावरील सीमा शुल्क वाढवून अनुक्रमे २० टक्के आणि ३२.५ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे देशांतर्गत शेतकऱ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना तसे कोणतेच चित्र अद्यापही बाजार समित्यात दिसत नाही. तेलाच्या आयात शुल्कातील वाढीनंतर तेलाचे दर वाढत असले तरी सोयाबीनचे भाव मात्र कमी कमीच होत आहेत. बाजार समित्यांत नव्या सोयाबीनची खरेदी किमान ३ हजार ५०० ते ४ हजार २०० रुपये याप्रमाणे खरेदी केली जात आहे. जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांत सध्याच सोयाबीनला कमाल ४५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंतच भाव मिळत आहे. त्यात आवक वाढल्यानंतर सोयाबीनच्या भावात वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. प्रतिक्विंटल, तर जुन्या सोयाबीनची खरेदी ३ हजार ८०० ते ४ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल भावानेच होत आहे. सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही वसूल होत नसल्याचे चित्र आहे. यंदा जिल्ह्यात सोयाबीनचा पेरा वाढला आहे. सध्या सोंगणी व काढणीची लगबग सुरू आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनला फटका बसला असून, उत्पादनात घट झाली आहे. अकोला बाजार समितीत सोयाबीनला जास्तीत जास्त ४ हजार ५३५ रुपये भाव जुन्या सोयाबीनला मिळाला, हा भाव हमीभावापेक्षा कमीत आहे. नवीन सोयाबीनला चार हजारापर्यंत प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे. तेल महिनाभरापूर्वीचे दर आता सोयाबीन ११० १३५ शेंगदाणा १७० १९० सूर्यफुल ११५ १३० मोहरी १४० १६० तेलाचे दर महिनाभरात वधारले

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article