नाडगाव येथे भैरवनाथ महाराज मंदिरात कीर्तन:महाप्रसादासह पालखी मिरवणूक, मूर्तीपूजन, आरती सोहळा, भैरवनाथ अष्टक पठणाचा कार्यक्रम

6 hours ago 1
तालुक्यातील नाडगाव येथील भैरवनाथ मंदिरात शनिवारी भैरवनाथ जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २३ रोजी भैरवनाथ जयंती ट्रस्टच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. यावेळी सर्व भाविकांनी भैरवनाथ महाराजांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे व कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २३ रोजी सकाळी ७ वाजता मूर्ती पूजन व आरती, ८ ते ९ पर्यंत भैरवनाथ अष्टक पठण, दुपारी १२ वाजता महाप्रसाद व सायंकाळी ४ वाजता पालखी पूजन आणि भैरवनाथ बाबांची पालखी मिरवणूक राहील. या मिरवणुकीमध्ये मुक्ताई कन्या भजनी मंडळ, महेश वाडी या दिंडी सोहळ्याचे विशेष आकर्षण राहणार आहे. त्यानंतर रात्री ८ ते १० या वेळेत आळंदी देवाची येथील कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाभळे यांचे कीर्तन होईल. या कीर्तनात नाडगाव, नांदगाव, धोनखेडा, राजूर, मनूर, एनगाव, वरखेड बुद्रुक, खुर्द व आमदगाव, कोल्हाडी, चिंचखेड, शिरसाळा, साळशिंगी, बेटावद तसेच बोदवड येथील विठ्ठल रुक्मिणी बाल भजनी मंडळ व परिसरातील टाळकरी मंडळी उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संदीप महाजन, गजानन पवार, कमलाकर ठोंबरे, विजय झांबरे, गजानन बढे, गजानन हिवरे यांनी केले आहे. असे आहे मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व नाडगांव येथील प्राचिन भैरवनाथ महाराज धार्मिक स्थळास तिर्थक्षेत्र ‘क' दर्जा मिळाला आहे. हा भाग पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या अधिपत्यात असतांना त्यांनी अनेक शिवमंदिरांचा जिर्णोद्धार व पायविहीरींचे निर्माण केल्याची इतिहासात नोंद आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी याठिकाणी यात्रा भरते. येथे जिल्ह्यातील भाविक दर्शनास येतात.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article