जलवायू परिवर्तन आणि AIच्या मुद्द्यावर भारत-जर्मनी साथसाथ; TV9चे MD-CEO बरुण दास यांचं मोठं भाष्य

5 hours ago 1

जर्मनीच्या स्टटगार्टमधील News9 ग्लोबल समिटचा आज दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या समिटला संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास यांनी या संमेलनाला संबोधित केलं. आजच्या स्वागतपर भाषणात बरूण दास यांनी जलवायू परिवर्तन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर अत्यंत महत्त्वाचं भाष्य केलं. Guten Morgen म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. जर्मन भाषेतील Guten Morgen या शब्दाचा अर्थ सुप्रभात असा होतो. सकाळी सकाळी कडाक्याची थंडी असूनही न्यूज9 ग्लोबल समिटला आल्याबद्दल पाहुण्यांचे त्यांनी आभार मानले. तसेच या संमेलनाच्या पहिल्या दिवशी भारताचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे दोघेही उपस्थित राहिल्याबद्दल बरुण दास यांनी त्यांचेही आभार मानले. भारत आणि जर्मनी हे दोन राष्ट्र द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी कशापद्धतीने वेगाने पुढे जात आहे, हेच या दोन्ही मंत्र्याच्या भाषणातून स्पष्ट होत असल्याचंही बरूण दास यांनी स्पष्ट केलं.

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या भाषणात भारत आणि जर्मनीचे संबंध दृढ करण्यावर प्रकाश टाकला. जर्मनी आणि भारताच्या दरम्यान जो नात्याचा पूल तयार झाला आहे तो स्टिल अथवा दगडी नाहीये. तर तो विश्वास आणि आदर्श आणि मूल्यांचा पूल असल्याचं ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं. तर, भारत जगात विश्वास, प्रतिभा आणि स्थिरता देण्यासाठी ओळखला जातो. आजच्या काळात भारत आणि जर्मनी स्किलचं अदानप्रदान करण्यातही प्रासंगिक झाल्याचं अश्विनी वैष्णव यांनी म्हटल्याचं बरूण दास यांनी स्पष्ट केलं.

अश्विनी वैष्णव आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या शिवाय स्टेट सेक्रेटरी फ्लोरियन हस्लर (Florian Hassler) यांच्या प्रतीही बरुण दास यांनी आभार व्यक्त केले. बाडेन-वुर्टेमबर्ग (Baden-Wurttemberg) सारख्या ठिकाणी भारतीय कार्पोरेट लीडर्सची प्रतिक्षा केली जात आहे, असंही त्यांनी सांगितलं. या सर्वांचे अत्यंत मोलाची भाषणे न्यूज 9 चॅनल आणि वेबसाईटवर पाहता आणि वाचता येणार आहे, असंही ते म्हणाले.

भारत विकसित राष्ट्र

भारत जगाच्या मंचावर कशा पद्धतीने स्वत:ला विकसित राष्ट्र म्हणून प्रेझेंट करत आहे, या मुद्द्यावर आजच्या सत्रात फोकस केला जाणार आहे. भारताच्या निरंतर विकासात जर्मनीचीही मोठी भागिदारी आहे. त्यावर आजच्या दुसऱ्या सत्रात चर्चा होणार असल्याचंही बरुण दास यांनी स्पष्ट केलं.

यावेळी बरुण दास यांनी एका लंच पार्टीच्या आयोजनाचा किस्साही ऐकवला. गेल्याच महिन्याची ही गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये चान्सलर ओलाफ स्कोल्ज यांच्या सन्मानार्थ लंच पार्टी दिली होती. अत्यंत उत्साह आणि जोशात पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. याच पद्धतीने मला विश्वास वाटतो की न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये सुरू असलेलं मंथन भारत आणि जर्मनीला जगाच्या व्यासपीठावर सार्थक उद्देशाने पुढे नेईल. दोघांचा संबंध धरती आणि पर्यावरणाच्या हिताचा असेल, असंही त्यांनी सांगितलं.

जलवायू परिवर्तनावर चिंता

यावेळी बरुण दास यांनी जलवायू परिवर्तनावरही भाष्य केलं. आज आपल्या सर्वांवर जलवायू परिवर्तनाचा परिणाम झालेला आहे. संपूर्ण जग जलवायू परिवर्तनच्या जाळ्यात ओढलं गेलं आहे. या मंचावरून आपण जलवायू परिवर्तनाबाबत एक नवीन सुरुवात करू शकतो. जलवायू परिवर्तनाचं वास्तव नाकारता येत नाही. चेन्नतील महापुरापासून ते वालेंसियापर्यंतच्या जलवायू परिवर्तनाच्या फटक्याची सर्वांना माहिती आहे, असं बरुण दास म्हणाले.

COP29 संपलं आहे. पण जलवायू परिवर्तनाला जबाबदार कोण? हा मोठा सवाल आहे. विभा धवन आणि अजय माथुरसारखे आपले अधिकारी COP29ला उपस्थित होते. त्यांनीही या शिखर संमेलनात भाग घेतला. त्यांचे आम्ही आभारी आहोत. आम्हाला त्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे. आज जलवायू परिवर्तनाच्या संकटाने अमीर-गरीब प्रत्येकाला एकसमानपणे प्रभावित केलं आहे. याच दृष्टीकोनातून या सत्रात जर्मनीचे अन्न आणि कृषी संघीय मंत्री केम ओजडेमिर यांचं महत्त्व अधोरेखित होतं. आम्ही या शिखर संमेलनात आपलं स्वागत करतो, असंही ते म्हणाले.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स चर्चेच्या केंद्रस्थानी

बरुण दास यांनी जलवायू परिवर्तनाशिवाय आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आवाका आणि उपयोग यावरही भाष्य केलं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. आज भारत प्रौद्योगिक क्षेत्रात आपली लीडरशीप निर्माण करू इच्छित आहे. देश आर्थिक आणि टेक्निकल महाशक्ती बनण्याच्या मार्गावर आहे. ग्लोबल कंपन्या भारताकडे पाहत आहेत. त्यांच्यासाठी भारत हा मजबूत पर्याय झाला आहे. त्यामुळेच आजच्या या ग्लोबल समिटमध्ये जगाच्या मंचावर वेगाने अर्थव्यवस्था पुढे नेणारा देश म्हणून पुढे आलेल्या अनोख्या भारतावरही आपण मंथन करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

गोल्डन बॉल सत्रात आपण बाडेन-वुर्टेमबर्गचे मंत्री, राष्ट्रपती विन्फ्रेड क्रेश्चमेन आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यानंतर मुख्य वक्ते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी एक अविस्मरणीय पुरस्कार सोहळा होणार आहे. या सोहळ्यात जगातील नामांकित मान्यवर आणि भारतीय ऑटो इंडस्ट्रीतील पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article