“नायर रुग्णालयाची वाटचाल कोलकाताच्या दिशेने…”, लैंगिक छळाच्या तक्रारींवरून मनसे आक्रमक, म्हणाले “नंतर एन्काऊंटर करण्यापेक्षा…”

2 hours ago 1

Sandeep Deshpande On Nair Hospital Molestation lawsuit : मुंबई महापालिकेच्या नायर हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा लैंगिक छळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित सहयोगी प्राध्यापकाला पालिका प्रशासनाने निलंबित केलं होतं. यानंतर आता मनसेने याप्रकरणी आवाज उठवला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेत याप्रकरणी उच्चपदस्थ महिला अधिकाऱ्याची नेमणूक करून चौकशी करावी अशी मागणी केली होती.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी नायर रुग्णालयात विद्यार्थिनीच्या लैँगिक छळाबद्दल भाष्य केले होते. “काल नायर वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना भेटलो. सगळेजण प्रचंड दहशतीखाली आहेत. नायरची वाटचाल कोलकात्ताच्या दिशेने होत आहे. महापालिका प्रशासनाने हे संवेदनशीलपणे हाताळले पाहिजे. नंतर कपाळाला हात लावून उपयोग नाही” असं संदीप देशपांडे म्हणाले होते.

त्यासोबतच त्यांनी आता पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी याप्रकरणी सविस्तर भाष्य केले. काल नायरमधील काही विद्यार्थी आम्हाला भेटले. त्यांनी आम्हाला कशाप्रकारे महाविद्यालयात त्यांचा लैंगिक छळ होतो, याबद्दल सांगितले. तसेच वारंवार तक्रार करुनही या तक्रारीवर कारवाई होत नाही. याप्रकरणी पॉश कमिटीने केलेल्या चौकशीत एकजण दोषी आढळला. त्याला नायर परिसरातून बाहेर काढण्याऐवजी त्याच परिसरात क्वार्टर देण्यात आली. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून ही क्वार्टर देण्यात आल्याच पत्रक काढण्यात आले, असे विद्यार्थ्यांनी संदीप देशपांडेंना सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी काळजी घ्यावी

आमची तक्रार केल्यास अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात. पोलीस स्टेशनला मुलगी तक्रार करायला गेल्यावरही एक महिला पोलिसांकडून स्टेटमेंट घेण्याऐवजी पुरुष पोलीस अधिकारी तिथे उभा करण्यात आला. आरोपीचा नंतर एन्काऊंटर करण्याऐवजी या घटना घडताना थांबवणे गरजेचे आहे. त्याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असे संदीप देशपांडे म्हणाले.

याप्रकरणी एका वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी, अशी आमची पोलीस आयुक्तांकडे मागणी आहे. मनसे या विद्यार्थ्यांच्या मागे आहे. राजसाहेब मागे उभे आहेत. तक्रार देण्यास विद्यार्थ्यानी समोर यावे. ज्यावेळी आमच्याकडे अधिकृत तक्रार येईल, तेव्हा आम्ही प्रशासन काय कारवाई करतंय, याची वाट पाहणार नाही. आम्ही मनसे स्टाईल भूमिका यात घेऊ, असा इशाराही संदीप देशपांडे यांनी दिला.

“आयुक्तांनी याची दखल घ्यावी, नाहीतर आम्हाला…”

“याप्रकरणी आयुक्त दुर्लक्ष करतात ही बाब खरी आहे. आम्ही पुन्हा त्यांना विनंती करतो की त्यांनी कारवाई करावी. आयुक्तांनी याची दखल घ्यावी, नाहीतर आम्हाला आयुक्तांची दखल घ्यावी लागेल. या प्रकरणाकडे संवेदनशील पद्धतीने बघितलं नाही तर आपला काहीही फायदा नाही”, असेही संदीप देशपांडे म्हणाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article