उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय:त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचतात, देवेंद्र फडणवीसांचा टोला

2 hours ago 1
मुंबई येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपला आहे. मराठी व हिंदू मते सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत. ते जिंकण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास ठेऊ नका, गाफील राहू नका. सरकारने केलेल्या कामांमुळे लोक आपल्यासोबत आहेत. मात्र अतिआत्मविश्वासामुळे आपली विकेट पडू देऊ नका. राज्यातील 3 कोटींपेक्षा जास्त जनता ही सरकारी योजनांचा लाभ घेत आहे. त्यांचे मते आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अमित शहा मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले. गत महिन्याभरातील त्यांचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा आहे. या दौऱ्यात ते मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी, मेळाव्याच्या सुरुवातीलाच त्यांनी कार्यकर्त्यांना भाषणाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्ड न करण्याचा सल्ला दिला. तसेच महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा अन् दशा बदलणारी असल्याचाही दावा केला. अमित शहा म्हणाले, मी सामान्य कार्यकर्त्यापासून भाजपच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यामुळे मला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नेहमीच आनंद होतो. काही निवडणुका देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात. हे मी माझ्या अनुभवाने सांगत आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही तशीच आहे. या निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची दिशा अन् दशा बदलेल. कारण, मागील 60 वर्षांत कोणताही राजकीय पक्षाला सलग 3 वेळा जिंकण्याची कामगिरी करता आली नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article