Chikhali Crime: विवाहितेच्या घरी जावून केला विनयभंग

2 hours ago 1

आरोपी विरुध्द गुन्हा दाखल

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (Chikhali Crime)  : घरात एकटीला पाहून आरोपीने वाईट उद्देशाने विवाहितेचा हात धरून तिचा विनयभंग केला अशा एका महिलेच्या तक्रारी वरुण पोलिसांनी १ ऑक्टोबर रोजी आरोपी विरुध्द (Chikhali Crime) गुन्हा दाखल केला आहे.

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील ३० वर्षांय विवाहितेने तक्रारी मध्ये नमूद केले की घरात एकटी असतांना आरोपी हा विवाहिते जवळ येवून म्हणाला की तुझे पतीचे माझा पत्नी सोबत अफेयर आहे आणि आता असे तू पण माझा सोबत चल असे, म्हणून वाईट उद्देशाने हात धरून विनयभंग केला. अशा महिलेच्या तक्रारी वरुण ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डायरी अमलदार रामेश्वर आंधळे यांनी आरोपी सुभाष राजकुमार शेळके यांच्या विरूध्द अप नं. २५९/२०२४ कलम ७४ , ३५१ (३) , ३५२ बिएनएस नुसार (Chikhali Crime) गुन्हा दाखल करून तपास बिट जमादार सिद्धार्थ सोनकांबळे यांच्याकडे सोपविण्यात आहे .

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article