राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा:विनोदोत्तम करंडकावर अभिनयंता पुणेच्या 'अश्विनी येना... 'ने उमटवली यशाची मोहोर

2 hours ago 1
हास्य जल्लोषाची पर्वणी ठरणाऱ्या आणि विनोद या विषयाला वाहिलेल्या महाराष्ट्रातील एकमेव अशा विनोदोत्तम करंडक राज्यस्तरीय खुल्या एकांकिका स्पर्धेत अभिनयंता पुणेच्या 'अश्विनी येना... ' या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत विनोदोत्तम करंडकावर यशाची मोहोर उमटवली. भरत नाट्य मंदिरात पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महवितरण, पुणेचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, मुख्य अतिथी ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ, विनोदोत्तम करंडकचे संस्थापक हेमंत नगरकर, मनोहर कोलते, अमित काळे, राजीव पुणेकर, अमर परदेशी- राजपूत आणि एम.जी. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हीला विनोदवीर पुरस्कार देऊन गोरविण्यात आले. तर ज्येष्ठ नाट्य कलावंत दीपक दंडवते यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यंदाच्या स्पर्धेत कलाविष्कार मंच चाकणच्या 'मॅरेज ॲकॅडमी'ने द्वितीय, पीव्हीपी आयटी पद्मच्या 'दोन वेडे' या एकांकिकेने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. एआयएसएसएमएस सीओईच्या 'अशी ही जुळवा जुळवी' उत्तेजनार्थ -प्रथम, तर दृष्टी,पुणेच्या 'नदीकाठचा प्रकार'ने उत्तेजनार्थ-द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. शिस्तबद्ध संघ म्हणून कलाकंड प्रॉडक्शनच्या 'अनामिका' एकांकिकेच्या संघाचा गौरव करण्यात आला. स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका अदिती द्रविड आणि नाट्यशास्त्राचे ज्येष्ठ विश्लेषक आणि अभ्यासक सुधन्वा पानसे यांनी काम पाहिले. या स्पर्धेत राज्यभरातून एकूण १७ संघ सहभागी झाले होते. बाल कलाकारांपासून ज्येष्ठ कलाकारांपर्यंत सगळ्यांच्या कलेला वाव देणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन गेल्या १६ वर्षांपासून करण्यात येते. यंदाचे स्पर्धेचे १७ वे वर्ष आहे. महवितरण, पुणेचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार म्हणाले की, जीवनात विनोद नसता तर जीवन निरस आणि बेरंगी झाले असते. निरोगी आयुष्यासाठी हसले पाहिजे आणि हसवलेही पाहिजे म्हणूनच विनादोत्तम सारख्या स्पर्धांची आवश्यकता आहे. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना प्रसिद्ध अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर म्हणाल्या की, विनोद म्हणजे केऑस नसतो. मुळात विनोद निर्मिती ही कठीण प्रक्रिया असून प्रेक्षकांसमोर सादरीकाण केल्या शिवाय आपला विनोद पोहोचतो आहे की नाही हे लक्षात येत नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article