नाशिक : देवळ्यात जोरदार पाऊस; शेकडो एकर मका भुईसपाट

4 hours ago 1
पुढारी वृत्तसेवा

Published on

26 Sep 2024, 6:48 pm

Updated on

26 Sep 2024, 6:48 pm

देवळा : गेल्या तीन ते चार दिवसांपासून तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून सप्टेंबर महिन्यात ८४.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात बुधवारी (दि.२५) रात्री आठच्या सुमारास वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये शेकडो एकर क्षेत्रावरील मका भुईसपाट झाला असून तूर, सोयाबीनबरोबर महागडे कांदा बियाणे वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

तालुक्यात तीन ते चार दिवसांपासून परतीच्या पावसाने चांगलाच जोर धरला असून काढणीला आलेल्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी वाहू लागल्याने पूर्व भागातील पाणी टंचाई दूर झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बुधवारी रात्री वादळी-वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने शेतात उभा असलेला मका भुईसपाट झाला. अनेक झाडे उन्मळून पडली. शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. तालुक्यातील पश्चिम भागात पावसामुळे कोलथी नदीचा प्रवाह वाढला असून हे पाणी थेट किशोर सागर (रामेश्वर धरणात ) मध्ये गेल्याने सांडव्याच्या पाण्यात वाढ झाली आहे.

दुसरीकडे या पावसामुळे महागडी कांद्याचे बियाणे वाया जाणार असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .

मंडळनिहाय झालेला पाऊस पुढीलप्रमाणे :

  • देवळा मंडळ- (दि. २४) ४.० मिमी, (दि.२५) ३.८ मिमी, (दि.२६) २८.३ मिमी.

  • लोहोणेर मंडळ- (दि.२४) ११.८ मिमी, (दि.२५) २.५ मिमी, (दि.२६) ३३.० मिमी.

  • उमराणे मंडळ - (दि.२४) ४४.३ मिमी, (दि.२५) १६.३ मिमी, (दि.२६) २४.८ मिमी.

  • खर्डे मंडळ - (दि.२४) ३५.५ मिमी, (दि.२५) ४.५ मिमी, (दि.२६) ४८.३ मिमी.

पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे फोटो काढून पीकविमा इन्शुरन्स कंपनीकडे ( corp insurance) ॲपवर तक्रार नोंदवावी.

चंद्रशेखर अकोले ,प्रभारी तालुका कृषी अधिकारी, देवळा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article