Published on
:
27 Nov 2024, 9:27 am
Updated on
:
27 Nov 2024, 9:27 am
नाशिक : लकी ड्रॉ कुपनवर बुलेट लागल्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी शेतकऱ्याला 26 हजार 600 रुपयांचा गंडा घातला.
ऑक्टोबर महिन्यात 7 तारखेच्या सकाळी नारायणगावमध्ये हा प्रकार घडला. सायखेडा पोलिसांना दत्त आवारे (49) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कुलस्वामिनी सेल्स मार्केटिंगच्या नावाने दोन सेल्समन त्यांच्याकडे आले होते. त्यांनी दिलेले कुपन स्क्रॅच केले असता, बुलेट वाहन लागले होते. त्यासाठी भामट्यांनी 26 हजार रुपये आगाऊ भरण्याची भुरळ घातली. त्यास भुलून आवारे यांनी जावयामार्फत ऑनलाइन पैसे भरले. मात्र, त्यांना बुलेट मिळालीच नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिस नाईक जाधव अधिक तपास करीत आहेत.