पालघर जिल्ह्यात स्थानिकांना रोजगाराचे कोणतेही ठोस साधन उपलब्ध नसल्याने येथील अनेक नागरिकांना जंगलातील सुकी लाकडे गोळा करून त्यांच्या मोळ्या बनवून व विकून कुटुंबाचा उदर निर्वाह चालवावा लागत आहे. Pudhari News network
Published on
:
27 Nov 2024, 11:48 am
Updated on
:
27 Nov 2024, 11:48 am
खानिवडे : गरीब आदिवासी जनता व दुर्बल घटकांचे उच्चाटन व्हावे म्हणून शासनाकडून अनेक योजना आखल्या व राबवल्या गेल्या. परंतु ग्रामीण भागातील आदिवासी व गरीब घटकांना आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता कसरत करावी लागत आहे
पालघर जिल्ह्यात स्थानिकांना रोजगाराचे कोणतेही ठोस साधन उपलब्ध नसल्याने येथील अनेक नागरिकांना जंगलातील सुकी लाकडे गोळा करून त्यांच्या मोळ्या बनवून व विकून कुटुंबाचा उदर निर्वाह चालवावा लागत आहे.
पालघर जिल्ह्यात स्थानिकांना रोजगाराचे कोणतेही ठोस साधन उपलब्ध नसल्याने येथील अनेक नागरिकांना जंगलातील सुकी लाकडे गोळा करून त्यांच्या मोळ्या बनवून व विकून कुटुंबाचा उदर निर्वाह चालवावा लागत आहे.
प्रमाणात आदिवासी वस्ती आहे. यामध्ये आजच्या घडीला अनेक आदिवासी कुटुंब कामधंद्या साठी वसई विरार भिवंडी पालघर भागात दिवाळीनंतर स्थलांतर करत असतात. पण ज्यांना आपले गाव सोडून जाता येत नाही अशी अनेक कुटुंब वन संपदेच्या आणि परिसराच्या स्रोतांतील उत्पन्नावर अवलंबून असतात.
यामध्ये उन्हाळ्यात कंदमुळे फळे, पावसाळ्यात रानभाज्या, शेती, गवत चारा विक्रीतून आपला रोजगार मिळवतात. मात्र त्यानंतर त्यांच्या हाती काही काम अथवा व्यवसाय नसल्याने स्वतःला सरपणासाठी व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लाकडे गोळा करून विकावी लागत आहेत. आदिवासी व गरीब घटकांना आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता कसरत करावी लागत आहे.