सध्या महागाईमुळे सर्व सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. दिवसेंदिवस बाजारातील अन्नधान्य, भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव देखील गगनाला बिडले आहेत. बाजारातील सर्व भाज्यांचे दर किलोमागे शंभराच्या पुढे गेले आहेत. अशातच घरातील डाळीला अधिक चविष्ट करणाऱ्या तसेच खूप पोषक तत्वे असलेल्या शेवग्याच्या शेंगांचे भाव थेट 400 रुपये किलोवर पोहोचले आहेत.
साधारणत: सर्व घरांमध्ये शेवग्याच्या शेंगांचा वापर होतो. शेवग्यांच्या शेंगांचा रस्सा, सुक्की भाजी, तळलेल्या शेंगा तसेच डाळ किंवा आमटी शेंगा टाकून बनवली जाते. त्यामुळे घरा घरात शेंग आणतातच. त्यात नाक्या नाक्यावर दिस