निवडणुकीआधी महायुतीत बंडाळीचे संकेत:आमदार गायकवाडांना उमेदवारी दिल्यास अपक्ष लढणार, शिंदे गटाच्या नेत्याचा भाजपला इशारा

2 hours ago 1
आगामी विधानसभेच्या तोंडावर कल्याण पूर्व मतदारसंघात महायुतीला बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. भाजपने विद्यमान आमदार गणपत गायवाड किंवा कुटुंबातील सदस्यांना तिकीट दिले तर अपक्ष निवडणूक लढणार, असा इशारा शिंदे गटाचे नेते तथा शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी भाजपला दिला आहे. या इशाऱ्यानंतर निवडणुकीआधीच महायुतीमध्ये बंडाळीचे संकेत पाहायला मिळत असल्याचे दिसून येत आहे. आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व मतदारसंघ भकास करुन ठेवला आहे. भाजपने त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना निवडणुकीचे तिकीट दिले, तर अपक्ष म्हणून त्यांच्याविरोधात उभा राहणार, असे महेश गायकवाड म्हणाले. या इशाऱ्यानंतर भाजप काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गणपत गायकवाडांना उमेदवारी मिळू न देण्यासाठी शिवसेनेने बांधला चंग 2008 मध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिकेतील काही वॉर्ड मिळून कल्याण पूर्व मतदारसंघाची निर्मिती झाली होती. भाजपचा हा पारंपारिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून गणपत गायकवाड तीन टर्मपासून आमदार आहेत. गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे समर्थक महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यामुळे आमदार गणपत गायकवाड यांना उमेदवारी मिळू नये यासाठी शिंदे गटाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कल्याण पूर्व मतदारसंघ घेऊन कल्याण पश्चिम देण्याची तयारी देखील शिंदे गटाने दर्शवली आहे. आमदार गणपत गायकवाडांचे गोळीबार प्रकरण काय? शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यात काही गुंठे जमिनीवरुन वाद सुरू होता. हे प्रकरण 2 फेब्रुवारी रोजी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात पोहोचले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोघे पोलिस ठाण्यात आले होते. गणपत गायकवाड यांनी रागाच्या भरात महेश गायकवाड यांच्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार केला होता. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. हेही वाचा... बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय यंत्रणा सावध:शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा घेण्याचा आग्रह, केंद्रीय गृह मंत्रालयाने साधला संपर्क माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सावध झाली असून राज्यातील आढावा घेतला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. यासाठी सुरक्षा यंत्रणा शरद पवार यांच्याशी संपर्क साधणार आहे. दरम्यान, केंद्रीय यंत्रणांनी यापूर्वीही शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा प्रदान केली होती, पण तेव्हा शरद पवारांनी सुरक्षा नाकारली होती. पूर्ण बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article