निवडणुकीच्या तोंडावर छगन भुजबळ अडचणीत?:महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील दोषमुक्तीच्या आव्हान याचिकावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी

4 days ago 2
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे मंत्री छगन भुजबळ पुन्हा अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह इतर दोघांनी कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळांना मिळलेल्या दोषमुक्तीविरोधात कोर्टात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. कथित महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी भुजबळ कुटुंबीयांना दोषमुक्ती मिळाली होती. एसीबीच्या विशेष न्यायालयाने 9 सप्टेंबर 2021 रोजी हा निर्णय दिला होता. याच निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्यांनी आव्हान दिले आहे. अंजली दमानिया, दीपक देशपांडे यांच्यासह आमदार सुहास कांदे यांनी तीन स्वतंत्र याजिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर एप्रिलमध्ये न्यायालयाने भुजबळ कुटुंबीयांना नोटीसा देखील बजावल्या होत्या. पण सुनावणी थंडावली होती. या आव्हान याचिकांवर तात्काळ सुनावणी घेण्यात यावी, यासाठी याचिकाकर्ते आग्रही आहेत. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकांमध्ये छगन भुजबळ यांच्या अडचणी वाढू शकतात. काय आहे हा घोटाळा ? छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, त्यावेळी जारी करण्यात आलेल्या विविध कंत्राटातून भुजबळ कुटुंबीयांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरुपाचा मिळाला, असा आरोप होता. महाराष्ट्र सदन आणि इंडिया बुल्स प्रकरणामध्ये राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 11 जून 2015 रोजी स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. यानंतर 15 जून 2015 रोजी सक्तवसुली संचालनालयाने देखील भुजबळ यांच्याविरोधात काळा पैसा प्रतिबंधक कायदान्वये दोन गुन्हे दाखल केले होते. यामध्ये समीर भुजबळ, पंकज भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख यांचा समावेश होता. भुजबळ 2 वर्षे होते तुरुंगात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाई करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर भुजबळ यांच्यावरील कारवाईला सुरुवात झाली होती. या प्रकरणात मार्च 2016 मध्ये छगन भुजबळ यांची 10 तासांपेक्षा अधिक चौकशी झाली होती. यावेळी त्यांना अटक झाली होती. त्यानंतर भुजबळ सुमारे 2 वर्ष तुरुंगात होते. हेही वाचा येवल्यात जरांगे-भुजबळ समर्थकांमध्ये राडा; मनमाड-नगर मार्गावर रास्ता रोको:जरांगेंनी शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर दोन्ही समर्थक आमने-सामने येवल्यात मराठा आंदोलक आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या समर्थकांमध्ये रविवारी (दि.१३) रात्री दहाच्या दरम्यान जोरदार राडा झाला. मनोज जरांगे पाटील येवल्यात शिवसृष्टीला भेट देण्यासाठी आल्यानंतर मराठा आंदोलक आणि भुजबळांचे समर्थक आमने-सामने आल्यानंतर वादावादी झाली. पूर्ण बातमी वाचा

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article