निवडणुकीपूर्वी सरकारची दिवाळी भेट:एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ रद्द, प्रवाशांना दिलासा

4 days ago 3
एसटी महामंडळाकडून दिवाळीनिमित्त दरवर्षी 10 टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. मात्र दिवाळीतील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता यंदा करण्यात आलेली हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील एसटी बसने प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसण्यापासून सुटका होणार आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील जनतेची नाराजी निर्माण होऊ नये, म्हणून भाडेवाढ रद्द करण्यात आली, असे बोलले जात आहे. एसटी महामंडळाने दिवाळीनिमित्त यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर अशी एका महिन्यासाठी हंगामी भाडे वाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भात परिपत्रक जारी करण्यात आले होते. ही प्रस्तावित भाडेवाढ मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरी बस वगळता सर्व बसेससाठी लागू होती. या भाडेवाढीमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवााशांच्या खिशाला झळ बसणार होती. मात्र एसटी महामंडळाने प्रवाशांना दिलासा देत हंगामी भाडेवाढचा निर्णय रद्द केला आहे. एका महिन्यात 950 ते 1000 कोटींच्या उत्पन्नाची होती अपेक्षा एसटी महामंडळाला सध्या दिवसाला सुमारे 22 ते 25 कोटी रुपयांचे तर महिन्याला 850 कोटींच्या आसपास उत्पन्न मिळते. हंगामी भाडेवाढनंतर दिवसाला 6 कोटी रुपयांचे उत्पन्न वाढण्याची शक्यता होती. तर हंगामी भाडेवाढीच्या महिभरात एसटी महामंडळाला 950 ते 1000 कोटींचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. यामुळे हंगामी भाडेवाढीचा निर्णय रद्द केल्याने सणासुदीच्या दिवसात महामंडळाच्या तिजोरीत अतिरिक्त रक्कम जमा होणार नाही. दरवर्षी होत असते हंगामी भाडेवाढ दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये लोक गावी तसेच पर्यटनासाठी जात असतात. यामध्ये बहुतांश लोक एसटी बसला प्राध्यान देतात. यामुळे प्रवाशांची बसेससाठी गर्दी होते. याच गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करत असते. एसटीला दिवाळीच्या काळात चांगले उत्पन्न मिळते. यावर्षीही उत्पन्न वाढीसाठी भाडेवाढीचा मार्ग स्वीकारला होता. परंतु, आता भाडेवाढ करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी भाडेवाढ लागू असणार नाही.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article