निवडणूक याचिका करताना नेमके आक्षेप, प्राथमिक पुरावे आवश्यक:भावनाशील होऊन चांगली पिटिशन होत नाही - असीम सरोदे
1 hour ago
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला काल निकाल जाहीर झाला. हा निकाल सर्वांसाठीच अनपेक्षित असा राहिला. महायुतीला भरघोस यश मिळाले असून भाजपने सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत. तर महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. तसेच दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला. या निकालानंतर विविध प्रतिक्रिया येत आहे. यावर अॅड. असीम सरोद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. केवळ भावनाशील होऊन हायकोर्टमध्ये चांगली पिटिशन होऊ शकत नाही, असे सरोदे यांनी म्हटले आहे. अॅड. असीम सरोदे यांची सोशल मीडियावरील पोस्ट अनेक जण जे निवडणुकीत हरले आहेत त्यांना निवडणूक निकाल चॅलेंज करायचे आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. मी आज अशा अनेकांच्या फोन कॉल्सला उत्तरे दिलीत. भावनाशील होऊन चांगली पिटिशन होऊ शकत नाही.
निवडणूक याचिका करताना नेमके आक्षेप, प्राथमिक पुरावे आवश्यक असतात. केवळ भावनाशील होऊन हायकोर्टमध्ये चांगली पिटिशन होऊ शकत नाही. मी उद्या शक्य झाल्यास याबाबत फेसबुक लाईव्ह करून निवडणूक याचिका करण्यासाठी आवश्यक माहिती देणार आहे. निवडणुकीला आव्हान देण्याचा हक्क केवळ हरलेल्या उमेदवारांना नाही तर कुणी त्या मतदार संघातील उमेदवार सुद्धा अशी याचिका करू शकतात, असे सरोदे यांनी म्हटले. निवडणूक प्रक्रियेसमोर विश्वासहार्यतेचे मोठे आव्हान
निवडणूक निकाल अनाकलनीय लागले हे तर अगदी महायुतीतील अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना माहिती आहे. आधी सुद्धा निवडणूका व्हायचे व लोक पराभूत व्हायचे पण निवडून आलेल्या व विजयी झालेल्या उमेदवारांच्या बाबत इतक्या शंका कधी नसायच्या. फ्री अँड फेअर निवडणूक प्रक्रियेसमोर विश्वासहार्यतेचे मोठे आव्हान असल्याचेही असीम सरोदे यांनी म्हटले. विधानसभा निवडणुकीचा निकाल
विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागांवर घवघवीत यश मिळाले. यामध्ये भाजपला 132, शिवसेना 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी 41 जागांवर निवडून आली आहे. तर महाविकास आघाडीला 48 जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला 16, ठाकरेंच्या शिवसेनेला 20 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागांवर यश मिळवता आले. इतर घटक पक्षांनी 10 जागा जिंकल्या.
*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times
(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.
Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)