निवारा बालगृहात अनाथ मुलांचे भवितव्य घडवण्याचे काम- माळी:जामखेड येथील निवारा बालगृह संस्थेत निवारा महोत्सवानिमित्त नृत्य स्पर्धा

2 hours ago 1
सामाजिक काम उभा करणे सोपे आहे, परंतु हे काम करीत असताना समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, या कामात सातत्यं ठेवणं गरजेचं आहे. हे सातत्य निवारा बालगृह संस्थेत दिसते. अनाथ मुलांचे भविष्य घडवण्याचे काम निवारा बालगृह करीत असल्याचे मत तहसीलदार गणेश माळी यांनी व्यक्त केले. निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या वतीने जामखेड तालुक्यातील सर्व शाळांमधून डान्स स्पर्धेचे आयोजन करून निवारा बालगृह मोहा फाटा (समता भूमी, ता. जामखेड) येथे निवारा महोत्सव-२०२५ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी तहसीलदार माळी बोलत होते. ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहातर्फे आयोजित निवारा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गटविकास अधिकारी शुभम जाधव, डॉ. सचिन काकडे, महादेव बांगर, प्रा. आप्पा शिरसाट, संतोष हापटे, ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे संचालक बापूसाहेब ओव्होळ, सचिव उमा जाधव, विशाल पवार, भीमराव चव्हाण, अशोक साळवे आदी उपस्थित होते. तहसीलदार माळी म्हणाले, की समता व सामाजिक न्यायाचे प्रणेते राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन या बालगृहाची स्थापना झाली आहे. हे काम महापुरुषांच्या विचारावर चालू आहे. संस्थेचे काम हे अगदी तळागाळातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांबरोबर त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी खूप मोठे आहे. अरुण जाधव म्हणाले, की व्यवस्थेने नाकारलेल्या माणसाच्या लढ्याचे नेतृत्व मी करतो. मी एक वाटसरू आहे. सर्व कार्यकर्त्यांचाही संस्था उभा करण्यात वाटा आहे. सामाजिक काम म्हणजे मान, अपमान, सन्मानाचं गाठोडं बांधून काम करणे. सत्कार मिळो न मिळो, हे काम करत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. विजेत्यांना बक्षीस देणाऱ्या अलका जाधव, अशोक नवनाथ शिंदे, विजय वायकर, अशोक साळवे, अमोल सातपुते, श्रीकृष्ण अटक, परशुराम अंबऋषी शिंगनाथ आदींचा गौरव करण्यात आला. प्रास्ताविक संचालक बापूसाहेब ओव्होळ यांनी, सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी, तर वैजीनाथ केसकर यांनी आभार मानले. नृत्य स्पर्धेचा निकाल लहान गटात प्रथम- प्रदीपकुमार महादेव बांगर विद्यालय, मोहा, द्वितीय- निवारा बालगृह समता भूमी, तृतीय- विस्डम इंग्लिश स्कूल, जामखेड यांनी मिळवले. मोठ्या गटात प्रथम- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खुर्देठण, द्वितीय- प्रदीपकुमार महादेव बांगर विद्यालय, तृतीय- निवारा बालगृह समता भूमी, जामखेड यांनी मिळवला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article