पंकजा विरोधी वक्तव्य केल्यामुळे पाथर्डीत धस यांचा पुतळा जाळला:विरोधात काम केल्याच्या आ. धस यांच्या आरोपानंतर मुंडे समर्थक आक्रमक‎

2 hours ago 2
पाथर्डी आष्टी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी विजयी सभेत माजी मंत्री, तथा आमदार पंकजा मुंडे यांनी आपल्या विरोधात काम केले. आपल्याला पाडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचा थेट राजकीय आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या निषेधार्थ मंगळवारी (२६ नोव्हेंबर) पाथर्डी शहरात मुंडे समर्थकांनी आ. धस यांचा निषेध करीत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. शहरातील नाईक चौकात धस यांचा पुतळा जाळून मुंडे समर्थकांकडून निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी मुकुंद गर्जे, धनंजय बडे, विजय आव्हाड, नितीन कीर्तने, माऊली खेडकर, उमेश खेडकर, राहुल खेडकर, हनुमान बडे, शिवनाथ खेडकर, पिणू मंचरे, रामहरी खेडकर आदी उपस्थित होते. आष्टी विधानसभा निवडणुकीत झालेल्या चौरंगी लढतीत आ. धस यांनी मोठा विजय मिळवला. त्यानंतर निघालेल्या विजयी सभेत आ. धस म्हणाले, की ‘तुम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून आम्हाला निवडणुकीत पाडण्यासाठी प्रयत्न केले. पंकजाताईंनी मला धोका द्यायला नको होता. माझ्याविरोधात काम करण्यास कार्यकर्त्यांना सांगितलं. तुमच्या कार्यकर्त्यांनी शिट्टीचा प्रचार केला’ असा आरोप केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. मुंडे समर्थकांनी आ. धस यांचा रविवारी सकाळी निषेध व्यक्त करून पुतळा जाळला. यावेळी धनंजय बडे यांनी आ. धस यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध केला. पंकजा मुंडे समर्थकांनी आ. धस यांचा पुतळा जाळून निषेध केला. ..तर ताकद कळली असती मुकुंद गर्जे म्हणाले, की आ. पंकजा मुंडे यांनी राज्यभर सभा घेऊन भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रामाणिक काम केले. त्याचे फलित म्हणून सर्व उमेदवार या निवडणुकीत निवडून आले. आष्टी मतदारसंघातही पंकजाताई यांनी धस यांच्यासाठी दोन सभा घेतल्या. मात्र, आ. धस यांनी उपकाराची जाणीव न ठेवता निवडून आल्यानंतर आपला रंग बदलून निवडणुकीत मुंडे यांनी मदत नाही केली नाही, असे बेछूट आरोप पंकजाताईवर केले. असे वक्तव्य त्यांनी निवडणुकीच्या आधी केले असते, तर त्यांना मुंडे समर्थकांची ताकद कळली असती. आ. धस यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article