पंडित सी. आर. व्यास यांच्या बंदिशी नव्या पिढीकडून ऐकण्याची उत्सुकता:अभिजात संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांची भावना

4 days ago 4
बंदिश ही कलाकाराची ओळख असते. अमूर्त गायकी बंदिशीच्या माध्यमातून मूर्त होत असते. पारंपरिक बंदिशींपेक्षा वेगळे, नवीन असे सांगीतिक विधान, हे ज्यांच्या बंदिशींचे वैशिष्ट्य आहे, त्या पंडित सी. आर. व्यास यांच्या बंदिशी नव्या पिढीतील कलाकारांकडून ऐकण्यासाठी आम्ही कलाकार म्हणून उत्सुक आहोत, अशी भावना अभिजात संगीत क्षेत्रातील विविध मान्यवरांनी सोमवारी व्यक्त केली. गुणीजान रिसर्च आर्ट कल्चर अँड एज्युकेशन (ग्रेस) फाउंडेशनतर्फे प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पद्मभूषण पंडित सी. आर. व्यास यांच्या 100व्या जयंतीनिमित्त देशपातळीवर गुणीजान बंदिश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या विषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. पंडित व्यास यांच्या बंदिशींवर आधारित या स्पर्धेची उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी दि. 15 ते 19 ऑक्टोबर 2024 या कालावधीत डॉ. श्रीराम लागू रंगावकाश, हिराबाग, पुणे (ज्योत्स्ना भोळे सभागृह आवार) येथे होणार आहे. स्पर्धेविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी गायन-वादन क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षक ज्येष्ठ गायिका अभिनेत्री निर्मला गोगटे, पद्मश्री तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, पद्मश्री पंडित उल्हास कशाळकर, पद्मभूषण पंडित साजन मिश्रा, पंडित सुहास व्यास, पद्मश्री पंडित सतिश व्यास याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. अंतिम फेरीत पोहोचलेल्यांची स्पर्धा दि. 15 ते दि. 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीत डॉ. श्रीराम लागू रंग अवकाश सभागृह, हिराबाग, पुणे येथे सकाळी 9:30 ते दुपारी 1:30 आणि दुपारी 2:30 ते रात्री 8:30 या कालावधीत होणार असून अंतिम स्पर्धा दि. 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजेपासून सुरू होणार आहे. तर पारितोषिक वितरण समारंभ दि. 20 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आला असून बक्षीस वितरण मान्यवर परीक्षक कलाकारांच्या हस्ते होणार आहे. 16 ते 30 वयोगटातील गायकांसाठी आयोजित या स्पर्धेत 125 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक फेरीतून निवड झालेल्या 50 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे. यात 25 मुली आणि 25 मुले आहेत. अंतिम फेरीही स्त्री आणि पुरुष अशा स्वतंत्र गटात होणार असून पहिल्या फेरीतून दहा, दुसऱ्या फेरीतून सहा तर तिसऱ्या फेरीतून प्रत्येकी तीन स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी केली जाणार आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article