पंढरपूरातही वृत्तपत्र विक्रेता दिन होणार साजरा:दैनिक दिव्य मराठीकडून‎ आज होणार वृत्तपत्र‎विक्रेत्यांची नेत्र तपासणी‎

2 days ago 2
वृत्त पत्र विक्रेता दिनानिमित्त मंगळवारी पंढरपूर मध्ये वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा करण्यात आला. दरम्यान यानिमित्त बुधवारी (दि.१६) वृत्तपत्र विक्रेत्यांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. येथील सुप्रसिध्द नेत्र तज्ञ डॉ. आकाश रेपाळ यांच्या डॉ. रेपाळ नेत्र रुग्णालय व फेको सेंटर येथे सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. डॉ. कलाम हे विद्यार्थी दशेत वृत्तपत्र विक्रेते होते, त्यामुळे यादिवशी वृत्त पत्र विक्रेता दिन साजरा केला जातो. येथील वृत्त पत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष श्री महेश पटवर्धन, कार्याध्यक्ष श्री संतोष कुलकर्णी ,खजिनदार श्री आनंद तेंडुलकर, संघटनेचे मार्गदर्शक गोरख भिलारे, सतीश लाड,शेखर तेंडुलकर, शिरीष तेंडुलकर, सचिन वाघमोडे,महादेव वाटाणे,संजय वाटाणे,संजय ताठे, जयंत ताठे,माळवदकर, लक्ष्मण कारटकर, योगेश आणेराव,रुपेश हरिदास,राजु आवताडे आणि दैनिक दिव्य मराठीचे ग्रामीणचे वितरण प्रतिनिधी अमोल गुब्याड आणि जाहिरात विभागाचे गणेश कुलकर्णी उपस्थित होते. या उपक्रमातून वृत्तपत्र विक्रेत्यांची नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article