पंतप्रधान मोदी, अमित शहा मुख्यमंत्रीपदावर जो निर्णय घेतील तो मान्य:शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार- दीपक केसरकर

2 hours ago 1
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्रीपदावर जो निर्णय घेतील तो मान्य राहील असे शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी कार्यकाळ संपल्याने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार अशी माहितीही त्यांनी यावेळी बोलताना दिली. दरम्यान दीपक केसरकर पुढे बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कार्यकाळ संपल्यावर राजीनामा देणं ही केवळ कायदेशीर प्रकिया आहे. त्या प्रमाणे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावा राजीनामा राज्यपाल यांच्याकडे दिला आहे. आजपासून ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील. उद्या भाजपचा गटनेता निवडला जाण्याची शक्यता दीपक केसरकर म्हणाले की, येणाऱ्या काही दिवसांमध्ये नवीन सरकार स्थापण होईल. उद्या भाजपच्या गटनेता निवडीची बैठक होण्याची शक्यता आहे. यानंतर तिन्ही नेते एकत्र बसून चर्चा करतील. यानंतर पक्षश्रेष्ठीसोबत चर्चा करत निर्णय घेतला जाईल. प्रत्येकाला आपला नेता सीएम व्हावे असे वाटते दीपक केसरकर म्हणाले की, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा. परंतू तिन्ही पक्षाने स्पष्ट सांगितले आहे की, जो निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा घेतील तो आम्हाला मान्य असेल. .. तर तिन्ही नेते दिल्लीला जातील दीपक केसरकर म्हणाले की, जर दिल्लीला बोलवण्यात आले तर राज्यातील तिन्ही प्रमुख नेते दिल्लीमध्ये जातील. पण जर पक्षाने राज्यात निरीक्षक पाठवण्याची भूमिका घेतली तर ते इथे येतील. ही सर्व पक्षाची अंतर्गत् बाब आहे, त्यावर मी जास्त काही बोलू शकत नाही. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहिल.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article