परतवाडा- धारणी रस्ताप्रकरणी शिवसेनेची पीडब्ल्यूडीवर धडक:संतप्त शिवसैनिकांनी अधिकाऱ्यासह घेतले स्वतःला कोंडून

2 days ago 4
काही दिवसांपूर्वी अमरावती परतवाडा मार्गे धारणी-खंडवा जाणाऱ्या खासगी बसचा अपघात झाला होता. यामध्ये पाच ते सहा जणांचा मृत्यू झाला होता. सेमाडोहजवळ असलेल्या या पुलाची लांबी, रुंदी कमी असल्यामुळे हा अपघात घडला असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी याआधी शिवसेना यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली. मात्र, त्याची दखल न घेतल्याने अखेर शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांनी कार्यकर्त्यांसह पीडब्ल्यूडीवर आंदोलन केले. या वेळी संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी अधिकाऱ्यांसह स्वतःला तब्बल दोन तास कोंडून घेतले. आंदोलनाची तीव्रता बघता अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. अमरावतीहून परतवाडा मार्गे धारणीवरून खंडवा जाणारी खासगी बस प्रवासी घेऊन जात असताना सेमाडोह गावालगत असलेल्या पुलावरून जाताना अपघात झाला. या अपघातात आदिवासी बांधव, आरोग्य सेवा देणारे कर्मचारी, अन्य प्रवासी जखमी झाले तर पाच ते सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. या मृत्यूला सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षित धोरण तसेच या रस्त्याच्या कामात झालेला भ्रष्टाचार जबाबदार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे म्हणणे आहे. हा अपघात नसून ही एक प्रकारची केलेली जाणीवपूर्वक हत्या असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. या अपघातातील पीडब्ल्यूडीमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी दोनदा निवेदनातून केली मात्र, अद्याप याकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप शिवसेनेने केला. तसा इशाराही याआधी शिवसैनिकांनी दिला होता. तत्पूर्वी, मंगळवारी दुपारी शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांच्या नेतृत्वात बांधकाम विभाग येथे शिवसैनिकांनी धडक दिली. या वेळी संतप्त शिवसैनिकांनी स्वतःसह अधिकाऱ्यांना कोंडून घेतले. कारवाई होईपर्यंत दालनाबाहेर निघणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. या वेळी कार्यालय परिसरात खळबळ उडाली होती. या आंदोलनाची तीव्रता बघता पोलिसांना बोलावण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने अधिकारी आणि आंदोलकांची भेट आणि चर्चा झाली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी प्रवीण हरमकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. साबांविच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त सार्वजनिक बांधकाम विभाग परिसरात मंगळवारी झालेल्या शिवसेनेच्या आंदोलनाची तीव्रता बघता पोलिसांनी बोलावण्यात आले होते. आंदोलकांनी अधिकाऱ्यांना कोंडून घेतले होते. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये तारांबळ उडाली होती.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article