परतीच्या पावसाने पंढरपुरला झोडपले, चळेत वीज पडून सहा शेळ्यांचा मृत्यू:ज्वारी, मका आणि नवीन लागवड झालेल्या ऊसाला लाभदायक

1 day ago 1
पंढरपूर शहर आणि तालुक्यात बुधवारी मध्यरात्री आणि दुपारी १ वाजल्यापासून सुमारे १ तासभर परतीच्या पावसाने अक्षरशः काढले, बुधवारी दुपारी ढगाचा गडगडाट आणि विजांच्या लखलखाट सह झालेल्या पावसाने शहरातील करून टाकले. तर चळे येथे वीज पडल्याने ६ शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. यंदाच्या हंगामात जेमतेम स्वरूपात हजेरी लावलेल्या मान्सूनने जाता जाता मात्र तालुक्याला झोडपून काढले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पंढरपूर शहर आणि तालुक्यात पाऊस गायब झालेला होता आणि ऑक्टोबर हिट मुळे नागरिक त्रस्त झालेले होते. वातावरणातील बदलामुळे नागरिक आजारी पडत असल्याचे चित्र दिसत असतानाच मंगळवार पासून तालुक्यात पावसाचे ढग दाटून आले. बुधवारी मध्यरात्री १ वाजता अचानक आलेल्या पावसाने संपूर्ण तालुक्यात हजेरी लावली. सुमारे १ तास संततधार पाऊस कोसळला. त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा तर मिळालाच पण ज्वारी, मका आणि नवीन लागवड झालेल्या ऊस पिकासाठीहि हा पाऊस लाभदायक ठरला आहे. शिवाय खोडवा आणि सुरुच्या उसालाही या पावसामुळे मोठा फायदा होणार असून उसाची वाढ अधिक चांगली होण्यास मदत होणार आहे. बुधवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास तालुक्याच्या पूर्व भागातून काळे कुट्ट ढग दाटून आले, हलक्या, थंडगार वाऱ्यासोबत ढगांचा गडगडाट सुरु झाला आणि पावसाने धो धो बरसायला सुरुवात केली. चळे येथे शेतात वीज पडल्याने नानासाहेब माने यांच्या ६ शेळ्या विज पडून दगावल्या. तर पंढरपूर शहरात सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी साठले होते. यामुळे जागो जागी वाहतूक खोळंबली, गटारे तुंबल्याने दुकानात, घरात पाणी शिरले, नवी पेठेत रस्त्यावरून पाटासारखे पाणी वाहत होते. सरगम चौकात रेल्वे पुलाखाली पाणी साठून वाहतूक ठप्प झाली होती. १६६ मिमी पावसाची नोंद पंढरपुर तालुक्यात १६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री मंडलनिहाय झालेला पाऊस पुढील प्रमाणे करकंब- १४ मिमी,पट कुरोली- ०० मिमी, भंडीशेगाव-१२ मिमी, भाळवणी- १० मिमी, कासेगाव -३ मिमी, पंढरपूर- २४ मिमी, तुंगत- ६३ मिमी, चळे- १७ मिमी आणि पुळुज-२३ मिमी असा पहाटे १६६ मि.मी पाऊस पडला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article