पराभवाच्या भीतीने मविआ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळताय:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा महायुतीवर आरोप

4 hours ago 2
राज्यात भाजप आणि महायुतीला आपला पराभव होतो हे माहिती आहे. यातून ते मतदान याद्यामध्ये गोंधळ करत रडीचा डाव खेळत आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. दम असेल तर समोरासमोर लढा, भाजप अन् महायुतीला राज्यातील जनता माफ करणार नाही, असेही त्यांनी मविआच्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे. दरम्यान नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, हारण्याच्या भीतीने भाजप अन् महासयुती करत आहे. योजना दुताच्या माध्यमातून सरकारी योजना जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सरकारी पैसा खर्च केला जात आहे. हे दुत कोणाचा प्रचार करणार हे सर्वांना माहिती आहे. योजनादुतांची मान्यता रद्द करण्याची मागणी निवडणूक आयोगाला करणार आहोत. राज्याच्या तिजोरीतून पैशांची उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. मविआच्या मतदारांचा नाव वगळण्याचा डाव नाना पटोले म्हणाले की, अनेकांचे फॉर्म नंबर 7 भरला जात असून नाव मतदार यादीतून रद्द केला जात आहे. मतदार यादीतून मविआच्या मतदारांची नावे वगळण्याचा भाजपचा डाव आहे. खोटी नावे मतदार यादीमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. ही नावे कमी करण्यामागे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचा हात असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे. तर महाराष्ट्ररातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल असेही त्यांनी म्हटले आहे. चिखलीमध्ये 2600 मतदान रद्द नाना पटोले यांनी तेल्हारा गावच्या सरपंच महिलेचा व्हिडिओ दाखवला यात मतदार यादीतील नावे वगळण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमच्या गावातील काही लोकांची नावे वगळण्यात आल्याचे समोर आल्याचे महिला सांगत आहे. चिखलीमध्ये गेल्या 10 दिवसात 2600 मतदान रद्द करण्यात आले. तिथे भाजपच्या उमेदवार आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली मतदार यादीत घोळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, प्रत्येक मतदारसंघात 5 हजार नावे वाढवली जात आहेत. सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली ही सर्व नावे वगळली जात आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ करण्यात आला असून एका कुटुंबातील लोकांची नावे वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आले आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article