परिवर्तन महाशक्ती आघाडी 150 जागा लढणार:तुम्ही कसले परिवर्तन आणणार? बच्चू कडूंचा शरद पवारांवर निशाणा

21 hours ago 1
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तयार झालेली तिसरी आघाडी म्हणजे परिवर्तन महाशक्ती आघाडीची महत्त्वाची बैठक पुण्यात पार पडली आहे. या बैठकीला छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू आणि राजू शेट्टी उपस्थित होते. परिवर्तन महाशक्तीने या बैठकीत महाराष्ट्रातील 150 जागांबाबत निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात देखील उमेदवार देण्याची तयारी या बैठकीत करण्यात आली आहे. तुम्ही कसले परिवर्तन आणणार? या बैठकीत बोलताना बच्चू कडू यांनी शरद पवारांवर देखील टीका केली आहे. बच्चू कडू म्हणाले, सामान्य माणसाला आपले वाटेल असे सरकार आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही करू. आम्ही चांगले उमेदवार देणार आहोत. पवारसाहेब म्हणतात परिवर्तन आणू, तुम्ही कसले परिवर्तन आणणार आहात? तुम्ही इतके दिवस सत्तेत होते, मग आता कसे काय परिवर्तन तुम्ही आणणार आहात? असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला. पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, परिवर्तनाचा अधिकार महायुतीलाही नाही आणि महाविकास आघाडीलाही नाही. परिवर्तनाची भाषा करण्याचा अधिकार आम्हाला आहे. नवीन परिवर्तन हे खऱ्या अर्थाने कामाचे असेल, बजेटमधील हिस्सा हा सामान्य माणसाचा असेल, असे बच्चू कडू म्हणाले. प्रस्थापित लोकांच्या विरोधात लढा देणारे उमेदवार देणार या बैठकीत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आम्ही या निवडणुकीत देणार आहोत. आमच्याकडे छोट्या मोठ्या 30 ते 40 संघटना असल्याचे देखील राजू शेट्टी यांनी सांगितले. पुढे बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले, प्रस्थापित लोकांच्या विरोधात लढा देणारे उमेदवार देणार आहोत. मनोज जरांगे पाटील यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. पण त्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यांनी आमच्यासोबत यावे, अशी आमची इच्छा असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article