Published on
:
16 Nov 2024, 3:17 am
Updated on
:
16 Nov 2024, 3:17 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधून एका आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाच्या तस्कराला अटक करण्यात आली आहे. त्याला फेन्सीडील या कंपनीचे अमली पदार्थ्याच्या 14 हजार 998 बॉटल्सची तस्करी करताना कारवाई करण्यात आली. गौतम मंडल असे ताब्यात घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय तस्कराचे नाव आहे. या बद्दलची अधिकृत माहिती नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शुक्रवारी (दि.15) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. या घटनेची माहिती वृत्तसंस्था 'एएनआय'ने सोशल मीडिया हँडल 'एक्स'वर पोस्ट शेअर करत दिली आहे.
Narcotics Control Bureau (NCB) arrested an International drug trafficker namely Gautam Mondal from Kolkata who was wanted in a seizure of 14,998 bottles of CBCS (brand name Phensedyl) of NCB Kolkata: NCB Kolkata pic.twitter.com/rQMnxLqMUB
— ANI (@ANI) November 16, 2024फेडरल अँटी नर्कोटिक्स एजन्सीने एका निवेदनात म्हटले आहे की, गौतम मंडलला 13 नोव्हेंबर रोजी कोलकाता येथून अटक करण्यात आली होती. “गौतम मंडल हा एक कुख्यात अंमली पदार्थ तस्कर असून त्याच्यावर कोट्यवधी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीसाठी डीआरआय (डिरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) गुन्हे दाखल आहेत. "पश्चिम बंगालमधून बांगलादेशात पाठवल्या जाणाऱ्या सीबीसीएस (कोडाइन-आधारित खोकला सिरप) च्या अवैध तस्करीवरही कारवाई केली होती," एनसीबीने सांगितले.
एजन्सीच्या म्हणण्यानुसार, पश्चिम बंगालच्या स्पेशल टास्क फोर्सद्वारे तपासल्या जात असलेल्या तीन अंमली पदार्थांच्या प्रकरणांमध्ये मंडल हा पूर्वीपासून वाँटेड गुन्हेगार आहे. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (NDPS) कायद्याच्या तरतुदींनुसार NCB ने त्याला अटक केली, पश्चिम बंगालमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून बांग्लादेशमध्ये फेंसडील कफ सिरपच्या सुमारे 15,000 बाटल्यांच्या कथित तस्करीशी संबंधित एका प्रकरणात आहे. फेन्सीडील हे CBCS आहे. एनसीबीने म्हटले आहे की मंडल हा "हार्डकोर" एनडीपीएस गुन्हेगार आहे ज्याची कार्यपद्धती अनेक स्तरांवर कार्यरत होती.