पहाटेपर्यंत अभ्यास, पाच वाजता घरासमोरील इमारतीवरून आदिश्रीने स्वत:ला दिले झोकून:सलग दुसऱ्या दिवशी विद्यार्थी आत्महत्येची घटना

3 days ago 3
बीड बायपास परिसरातील स्वप्नपूर्ती एन्क्लेव्ह परिसरात राहणाऱ्या आठवीच्या विद्यार्थिनीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सोमवारी (१४ ऑक्टोबर) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आदिश्री त्र्यंबक जाधव (१२) असे मृत मुलीचे नाव आहे. सातारा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी शाळकरी विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. रविवारी साहिल नांदेडकर या विद्यार्थ्यांने गळफास घेतला होता. त्यानंतर आदिश्रीने सोमवारी आत्महत्या केली. आदिश्रीचे वडील मथुरा येथे भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलसह अस्थिरोगतज्ज्ञ होते. त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने २०१६ मध्ये निधन झाल होतेे. आई बीएचएमएस डॉक्टर आहेत. मोठा भाऊ बारावीत आहे. सोमवारी पहाटे पाच वाजता आदिश्रीने घरासमोरील बिल्डिंगवरून उडी घेत आत्महत्या केली. थेट सवाल विद्यार्थ्यांमध्ये तणावाची कारणे काय? विद्यार्थ्यांमध्ये तणावाची कारणे काय? शैक्षणिक आणि करिअर स्पर्धेचा दबाव, समाज, कुटुंबाच्या उच्च अपेक्षा. मात्र मुलांच्या भावना समजून घेतल्या जात नाहीत. मुलांना गरज वाटते तेव्हा त्यांना आधार मिळत नाही. त्यामुळे ते अधिक खचतात. फर्स्ट्रेट झालेल्या मुलांना कसे ओळखावे? या मुलांमध्ये व्यसनाचे वाढते प्रमाण, मोबाइलचे व्यसन, चांगल्या मित्र-मैत्रिणींच्या सान्निध्याचा अभाव. फँटसी आणि कल्पनेच्या जगात वास्तव्य. बोलताना त्यांच्या डोळ्यांचे हावभाव, हातापायांच्या हालचाली, झोपेत अस्वस्थ, राग खूप येणे ही लक्षणे आहेत. पालकांनी काय काळजी घ्यावी ? मुलांना तणामुक्त करण्यासाठी, सकारात्मकतेसाठी मुलांसोबत किमान २० मिनिटे ते अर्ध्या तास वेळ काढा. मुलांसोबत असताना सोबत मोबाइल ठेवू नका. त्यांना विश्वास द्या. आठवडाभरात तीन घटना ट्यूशनहून घरी परतलेल्या त्रिपुरा जगन औटे या तरुणीने गळफास घेत शुक्रवारी आत्महत्या केली. बारावी वर्गात शिक्षण घेणाऱ्या साहिल शीलवंत नांदेडकर या विद्यार्थ्यांने रविवारी गळफास घेत आत्महत्या केली. आठवी वर्गात शिक्षण घेणाऱ्या आदिश्री त्र्यंबक जाधव हिने सोमवारी चौथ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी घेत आदिश्रीचा दुदैवी शेवट.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article