Singer Personal Life: झगमगत्या विश्वात असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी संघर्ष करून बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पण प्रसिद्ध आणि लोकप्रियता मिळाल्यानंतर सेलिब्रिटी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले. असंच काही झालं आहे गायक उदित नारायण यांच्यासोबत… उदित नारायण यांनी पहिली पत्नी रंजना झा असताना मुंबईत दीपा गहतराज यांच्यासोबत लग्न केलं.
पहिल्या पत्नीच्या नकळत उदित नारायण यांनी दुसरा संसार थाटला. त्यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल जेव्हा पहिल्या पत्नीला कळलं, तेव्हा हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. तर उदित नारायण यांच्या आयुष्यातील ही बाजू फार कमी लोकांना माहिती आहे. बिहारच्या छोट्या गावात जन्मलेले उदित नारायण मुंबईत संगीत विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी आहे.
करीयरच्या सुरुवातील उदित नारायण यांनी प्रचंड संघर्ष केला आणि आपल्या दमदार आवाजाने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाल्यानंतर उदित नारायण यांनी पहिल्या पत्नीच्या नकळत दीपा गहतराज यांच्यासोबत दुसरं लग्न केलं.
उदित नारायण यांची पहिली पत्नी त्यांच्या प्रतीक्षेत अनेक वर्ष बिहार याठिकाणी राहिली. पण एक दिवस असा आला जेव्हा रंजना यांना नारायण यांच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कळलं. तेव्हा रंजना यांना मोठा धक्का बसला आणि त्या मुंबईत आल्या.
मुंबईत आलेल्या रंजना यांना जेव्हा उदित नारायण यांनी ओळखण्यास देखील नकार दिला तेव्हा प्रकरण कोर्टात पोहोचलं. कोर्टात पोहोचल्यानंतर उदित नारायण यांनी पहिली पत्नी रंजना यांची जबाबदारी स्वीकारली…
मीडियारिपोर्टनुसार, रंजना यांनी उदित यांच्यावर आरोप केले होते. ‘आपल्या लग्नाबद्दल सर्वांना माहिती झाल्यास मी स्वतःला संपवेल…’ अशी धमकी उदित नारायण यांनी पहिल्या पत्नीला दिला. पण त्यांच्या धमकी न घाबरता रंजना यांनी स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवला.