Pakistan Violence : महागाईशी झुंजणाऱ्या पाकिस्तानला अजून भीकेचे डोहाळे लागले आहेत. माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटून इम्रान खान यांच्या समर्थकांनी राजधानी इस्लामाबाद वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. ताज्या हिंसाचारात चार पोलीसांचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले.
पाकिस्तान हिंसाचार
महागाईशी झुंजणाऱ्या पाकिस्तानला भीकेचे डोहाळे लागले आहेत. इम्रान खान समर्थकांनी केलेल्या ताज्या हिंसाचाराने या देशाची पावलं गृहयुद्धाकडे तर चालली नाहीत ना, असा दावा करण्यात येत आहे. यापूर्वी मौलानाच्या आंदोलनाने पाकिस्तान ढवळून निघाला होता. त्याच्या समर्थकांनी देशातील प्रमुख शहरांना त्यावेळी वेठीस धरले होते. पण मौलानाला राष्ट्रीय निवडणुकीत करिष्मा दाखवता आला नाही. आता इम्रान समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. ताज्या हिंसाचारात चार पोलीस मारल्या गेले. तर 100 हून अधिक लोक आणि पोलीस जखमी झाले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच सरकारने पाकिस्तानी लष्कराला पाचारण केले. अनुच्छेद 245 लागू करण्यात आला. दंगेखोरांना दिसता क्षणीच गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इमरान खानची सुटका करा
माजी पंतप्रधान इमरान खान हा गेल्या वर्षापासून पाकिस्तानच्या तुरुंगात आहे. 72 वर्षांचे इमरान खान गेल्या वर्षी ऑगस्टपासून तुरूंगात आहे. त्याच्या सुटकेच्या मागणीसाठी समर्थकांनी काल हिंसक आंदोलन केले. त्यांनी संसदेपर्यंत लाँग मार्च काढला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी धरणे देण्याची घोषणा केली. पण PTI कार्यकर्ते आणि पोलिसांत जागोजागी धुमश्चक्री झाली. त्यात चार पोलीसांचा जीव गेला. तर अनेक पोलीस गंभीर जखमी झाले. सध्याच्या केंद्र सरकारविरोधात समर्थक आक्रमक झाले आहे. कायद्यातील काही तरतुदीत बदल करून इम्रान खान यांना तुरूंगातच मारण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी लावला आहे. हे हुकूमशाही सरकार असल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे.
हे सुद्धा वाचा